Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२६
दिंडोरी पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी बैठकीत आरोग्य सेवकांचा सत्कार.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी येथील पंचायत समितीमध्ये बुधवार दि.१५ एप्रिल रोजी दुपारी४ चार वा.ग्रामपंचायत कर्मचारी यांची नुकतीच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष बापू मोरे सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण गावरान कट्ट्याचे संपादक संदीप गुंजाळ.ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले,पत्रकार गोरख जाधव उपस्थित होते.या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या करिता जिल्हा परिषद सेवेतील राखीव असलेल्या १० टक्के आरक्षण मधून पालखेड बंधारा येथील संदीप गायकवाड, साहेबराव गोतरणे व वरखेडा येथील भाऊराव उपाडे यांची आरोग्य सेवक म्हणून नुकतीच नियुक्ती झाल्याने त्यांचा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ४५११ च्यावतीने सुपत्नीक सत्कार गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच या भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोलाचे विशेष असे सहकार्य लाभले म्हणून सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण व गावरान कट्टा चे संपादक संदीप गुंजाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे तालुकाध्यक्ष श्यामराव ढुमसे,उपाध्यक्ष हरिभाऊ उघडे, सचिव वंदना निगळ,संघटक सतीश वाघ,कर्मचारी सुनील गावंदे रूपाली गडकरी,विजय चौधरी,रवी आहेर, दत्ता गायकवाड,योगेश आहेर, विलास कुवर,हिरामण महाले, छाया गायकवाड,सरला गोतरणे,आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांनी मानले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा