Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ एप्रिल, २०२६
स्त्री सशक्तीकरणाचे उद्धारकर्ते,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
कुठल्याही समाजाची किती प्रगती झाली आहे? हे ,जर कुणालाही बघायचं असेल तर "त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवर त्या समाजाची प्रगती अवलंबून असते फक्त पुरुषांच्या प्रगतीवर नाही"! असे म्हणणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी "हिंदू कोड बिल "च्या माध्यमातून स्त्रियांसाठी खूप मोठे योगदान केले आहे.त्यामुळे स्त्रियांना संपत्तीमध्ये समान हक्क मुलांबरोबर तर मिळालेच,पण पुनर्विवाहाची मुभा,घटस्फोटाचा अधिकार,एवढेच नव्हे तर शिक्षणाचा अधिकार संपत्तीमध्ये समान अधिकार विवाह आणि स्वातंत्र्य,स्वाभिमान यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित असणाऱ्या स्त्रियांना सर्व मूलभूत अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने "स्त्री सशक्ति करण्याचे उद्धारक आहे.बाबासाहेबांनी भारतीय संविधानात स्त्री पुरुष समानतेचा अधिकार दिलाच ज्यामुळे स्त्रियांना शिक्षण,नोकरी आणि स्वातंत्र्याचा मार्ग खुला झाला.
आज जी भारतीय स्त्री स्वाभिमानी जगते,शिक्षण घेते,नोकरी करते आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेते त्यामागे बाबासाहेबांचे अधिक प्रयत्न आणि दूरदृष्टी यामुळेच हे शक्य झाले.बाबासाहेबांवरती क्रांतीसुर्य स्त्री मुक्तीचे उद्धारक ज्योतिराव फुले, आणि गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता.औरंगाबाद येथे जेव्हा" मिलिंद महाविद्यालयाची "स्थापना केली तिथेही स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला आणि प्रवेशही दिला.खाणकाम करणाऱ्या,कोळसा खाणीत काम करणाऱ्या महिलांना पुरुषांनं इतकाच पगार मिळावा त्याचप्रमाणे प्रसुती भत्ता मिळावा यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी प्रयत्न केले.
बहुपत्नीत्वाच्या प्रथेला विरोध बाबासाहेबांनी केला.मजूर आणि कष्टकरी स्त्रियांना २१ दिवसांची किरकोळ रजा,एक महिन्याची हक्काची रजा इजा आणि दुखापत झाली तर रजा त्याचप्रमाणे वीस वर्षे सलग सेवा झाल्यानंतर पेन्शन या सगळ्या योजना बाबासाहेबांमुळेच शक्य झाल्या.आज नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जी प्रसूती रजा मंजूर झाली ती फक्त आणि फक्त आपल्या बाबासाहेबांमुळे..आपल्या देशात ती प्रथम मिळाली आणि इतर देशांमध्ये यानंतर स्त्रियांना ही रजा मंजूर झाली.युरोपात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी, संघर्ष करावा लागला परंतु भारतामध्ये मात्र न मागताच हा अधिकार बाबासाहेबांनी स्त्रियांना मिळवून दिला.आज बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी केलेले कायदे सुधारणा आणि दिलेले अधिकार हे केवळ कायद्यापुरतेच मर्यादित नसून ते स्त्रीच्या सन्मानाचे प्रतीक बनले आहे.
ज्या समाजात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात होते ,"चुल आणि मूल" हे एवढेच अस्तित्व होते त्या समाजात असा क्रांतिकारक बद्दल घडून आणणारे बाबासाहेब खरंच स्त्री सशक्तीकरणाचे खऱ्या अर्थाने पाईक आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नंदुरबार प्रतिनिधी :- आज सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी संत श्री भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम शहरातील नव...
-
नंदुरबार प्रतिनिधी :- संत भिमा भोई जन्मोत्सवानिमित्त येथील नवी भोई गल्लीतील भोई सामाजिक भवनात नंदुरबार शहर व उपनगर संत भिमा भोई जयंती उत्सव ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा