Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

मानवी जीवनात नाम‌ साधना महत्त्वाची, ह.भ.प.नांदुर्डीकर.




बापू चव्हाण दिंडोरी

   मानवी जीवन जर सुखात घालवायचे असेल तर मानवाने नाम साधनेत आपले मन एकाग्र केले पाहिजे.असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार ह.भ.प. भागवताचार्य निवृत्ती महाराज नांदुर्डीकर यांनी चांदवड तालुक्यातील शिवरे येथील भव्यदिव्य सप्ताहातील किर्तना प्रसंगी प्रतिपादीत केले.
      सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवरे येथे भव्य दिव्य सप्ताह आयोजित केला आहे.त्यामध्ये महाराष्ट्रांतील नामवंत किर्तनकारांची‌ किर्तने आयोजित केले आहे.त्यामध्ये दिंडोरी तालुक्यांचे वैभव व महाराष्ट्रांतील नामवंत किर्तनकार ह.भ.प. भागवताचार्य निवृत्ती महाराज नांदुर्डीकर यांनी आपल्या किर्तन सेवेत मुखी नाम हाती मोक्ष या तुकोबारायांच्या अभंगांवर चिंतन करत असताना मानवी जीवनात नामाचे महत्त्व,नाम साधना,नामाचे वैशिष्ट्ये ,नामधारकांची नाम साधनेतील महत्त्व,स्थुल देह,सुक्ष्म देह,कारण‌ देह,महाकारण,आणि कैवल्य अवस्था यावर आपल्या अभ्यासपूर्ण व रसाळ वाणीतून वर्णन करीत उपस्थित श्रोते व भाविकांची मंञमुग्ध केले.
      मानवाला जर या भवसागरांतुन तरूण जायचे असेल तर मानवाला नाम साधना करणे अतिमहत्त्वाचे आहे. तर समुद्र तरूण जायचा असेल तर चांगली नाव लागते.तेथे छिद्र असलेली नाव चालणार नाही.हे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात.तसं मानवाला मोक्ष मिळवायचा असेल तर नाम साधना करणे महत्त्वाचे आहे.महाराजांनी आपल्या किर्तनात तुकोबांराय, ज्ञानेश्वर महाराज आदी संतांचे अभंग गाऊन प्रमाण सिद्ध केले.या सप्ताहांसाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत गायक व वादक उपस्थित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध