Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २४ मे, २०२६
नंदुरबार येथे संत भिमा भोई जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
नंदुरबार प्रतिनिधी :- संत भिमा भोई जन्मोत्सवानिमित्त येथील नवी भोई गल्लीतील भोई सामाजिक भवनात नंदुरबार शहर व उपनगर संत भिमा भोई जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात
आले होते या शिबिरात २५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांमध्ये सुनिल मोरे (पोलीस), गणेश वाडीले (सर), संजय साठे, लखन माळी, कृष्णा हिरालाल भोई, सामाजिक कार्यकर्त्या सौ. योगिता महेंद्र मोरे, कु. रीतू बेडसे, राज बेडसे, संजय साठे आदींसह २५ भगिनी-बंधूंचा समावेश होता.
यावेळी नगरसेवक हिरालाल चौधरी, आकाश चौधरी, आकाश अहिरे, शक्ती हनुमान पीठाचे सुरेश भोई, आशिष कडोसे, गणेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अर्थ व नियोजन स्थायी सदस्य इंजि. रामकृष्ण मोरे, अँड. प्रकाश भोई, राजेंद्र भोई, जितेंद्र खेडकर भोई, सुरेश वाडीले, डॉ. गणेश ढोले यांच्यासह यंदाच्या समितीचे अध्यक्ष दिपक नुक्ते, उपाध्यक्ष हिमांशू ढोले, सचिव अंकुश ढोले तसेच जनकल्याण रक्तपेढी केंद्राचे प्रतिनिधी रणजीत राजपूत, जयश्री पाटील, पूनम पटेल आणि गोरख भील यांनी अथक परिश्रम घेतले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा