Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

जोपूळ शाळेची शैक्षणिक वाटचाल प्रगतीपथावर,अँड उगले.



बापू चव्हाण नाशिक

       जोपूळ येथील प्राथमिक शाळेची वाटचाल प्रगतीपथावर असून शाळेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गौरवोद्गार अ‍ॅड.विठ्ठल उगले यांनी काढले.ते जि.प.प्राथ.शाळा जोपूळ येथे आयोजित विविध गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
       कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच माधव उगले,नंदु बोंबले, डॉ.योगेश गोसावी,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल कदम,प्रभाकर उगले,एकनाथ बुरडे,ग्रामसेवक भाऊसाहेब गोसावी,बाळासाहेब आहेर,नवनाथ पगार,बाळासाहेब उगले,जनता विद्यालय लोखंडेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना गांगुर्डे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान उगले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
       प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमांतर्गत शैक्षणिक गुढी उभारून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.शालेय गीतमंचाने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थांचे स्वागत गुलाबपुष्प व खाऊ वाटप करून करण्यात आले. 
        शाळेच्या दिडशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच नवोद्य विद्यालयात प्रवेश पात्र झाल्याबद्दल पालकांसमवेत अभेद्य आहेर तसेच केंद्रप्रमुख परीक्षेत सुयश संपादन केल्याबद्दल जोपूळ शाळेतील अनिल भरीतकर व धामणवाडी शाळेतील अमित आहेर तसेच वर्षा गांगुर्डे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच नवोद्य परिक्षेत उल्लेखनीय सुयश संपादन केल्याबद्दल अकरा विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
   जोपूळ शाळेचा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शालिनी देवरे तसेच बदली झालेल्या जयश्री शिरसाठ यांचा देखील भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देतांना अनिल भरीतकर व शालिनी देवरे यांनी ग्रामस्थांचे ऋण व्यक्त केले.तसेच प्रवेशपात्र विद्यार्थी व नवोद्य परीक्षेसंदर्भात राज्य गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षक विलास जमदाडे यांनी आपले विचार मांडले.
याप्रसंगी योगेश गोसावी,मंगेश गांगुर्डे,मुख्याध्यापिका कल्पना काळे, अंगणवाडी सेविका सुरेखा मोरे यांनी मनोगत व्यक्त करून जोपुळ शाळेच्या वाटचालीबद्दल कौतुक करून १०० % विद्यार्थी शाळेत दाखल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशाबाई जाधव,सूत्रसंचालन रावसाहेब जाधव तर आभार शरद धादवड यांनी मानले.कार्यक्रमास प्रभाकर उगले, एकनाथ बुरडे,बापू पगार,अंबादास गांगुर्डे,विजय उगले,भाऊसाहेब पगार,गणपत उगले,खंडेराव उगले, अशोक उगले,रोहिदास गांगुर्डे, बाळनाथ गांगुर्डे,श्यामराव गोसावी, दत्ता जाधव,डाॅ.रोहिणी टर्ले/धारराव, अर्चना गांगुर्डे,श्रीकांत अहिरे,देवराम पगार,संजय उगले,संदीप क्ष्रीरसागर, प्रभाकर गायकवाड,अंगणवाडी सेविका,मदतनीस आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ,आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष जाधव,राजेंद्र ठेपणे,रामनाथ उगले, प्रमिला उगले आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध