Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२६

शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी पिस्तुलसह दोघांना रंगेहाथ पकडले


शिरपूर (प्रतिनिधी):

शिरपूर शहर व परिसरात बेकायदेशीर शस्त्रांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी एका गावठी बनावटीच्या पिस्तुलसह दोन जिवंत काडतुसे जप्त केली असून दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गुप्त बातमी मिळाली होती की, दोन इसम शिरपूर-शहादा रोडवरील शिंगावे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावठी पिस्तुलची खरेदी-विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीची खात्री पटल्यानंतर लागलीच गुन्हे शोध पथकाला (डी.बी. पथक) कारवाईचे आदेश देण्यात आले.

असा रचला सापळा:

पोलीस पथकाने पंचांसह शिंगावे फाट्याजवळ सापळा रचला. दुपारी २.१० वाजेच्या सुमारास दोन संशयित तरुण एकमेकांशी काहीतरी देवाण-घेवाण करताना दिसून आले. संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने छापा टाकून दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

आरोपींची नावे व जप्त मुद्देमाल:

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१) पवन दादा कोतवाल (वय १९, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे)

२) अक्षय संदिप पाटील (वय २१, रा. भटाणे, ता. शिरपूर)

​झडतीदरम्यान पवन कोतवाल याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे स्टीलचे पिस्तुल (काळ्या फायबर मुठीसह) आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी शस्त्र आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत.

यांनी केली कारवाई:

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

​या पथकात पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी, पोउनि संदिप दरवडे, डी.बी. पथकातील पोहेकॉ रवींद्र आखडमल, अतुल पाटील, पोकों आरीफ तडवी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, विनोद आखडमल, सचिन वाघ, भटू साळुंखे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी तसेच चापोकों रवींद्र महाले व विजय पाटील यांचा समावेश होता.

​आरोपींविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध