Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करणाऱ्या सागर मोर याच्या विरोधात गुन्हा दाखल करणेबाबत वणी पोलीस ठाण्यात निवेदन.
सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करणाऱ्या सागर मोर याच्या विरोधात गुन्हा दाखल करणेबाबत वणी पोलीस ठाण्यात निवेदन.
*सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सागर मोर याच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन दाखल* वणी येथील जैन मारवाड समाजाचे रहिवासी यांनी सागर मोर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणे संदर्भात तक्रार स्वरूपाचे निवेदन वणी पोलिसांना दिले आहे कथित निवेदनात नमूद असे कि एका व्हाट्सअप ग्रुपवर
सागर मोर नावाच्या व्यक्तीने पाठवलेला एक संदेश प्राप्त झाला. या संदेशात त्याने मारवाडी समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह विधाने केली आहेत सदर संदेशात त्याने "ओबीसी/एससी/एसटी/एनटी हे लोक लाईनमध्ये उभे राहतात, पण तुम्ही कधी मारवाडी लाईनमध्ये पाहिलेत का?" असे विचारून समाजाबद्दल संशय निर्माण केला आहे. तसेच "इंडिअन गॅस गोदाऊनवर चौकशी करावी" असे म्हणून शांततापूर्ण जगणाऱ्या व्यावसायिक समाजाला विनाकारण टार्गेट केले आहे या विधानामुळे मारवाडी आणि जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, यामुळे विविध जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे विधान सामाजिक सलोखा बिघडवणारे आणि एका विशिष्ट समाजाची बदनामी करणारे आहे. या कृत्यामुळे समाजात द्वेष भावना पसरू शकते, ज्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे निवेदनात नमूद आहे वणी पोलिसांनी या निवेदन तक्रारी अर्जाची दखल घेऊन, सदर आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या आणि पसरवणाऱ्या सागर मोर याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (बि. एन. एस ) संबंधित कलमांनुसार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (आय टी ऍक्ट ) अन्वये त्वरित गुन्हा दाखल करावा असे निवेदनात नमूद असून या निवेदनावर महेंद्र भावरीलाल पारख,प्रवीण बोरा,महेंद्र किसनलाल बोरा, महेंद्र लोढा, कैलास चोपडा, माधव खाबिया, हितेश पारख, कुशल कटारिया, मनोज बोथरा, किशोर बोरा, विजय बोथरा, सुनील बोरा, अमित संचेती, प्रितेश खाबिया, प्रफुल बोरा, दर्शन पारख, तुषार समदडिया, आशिष शिसोदिया, रोशन समदडिया, सागर बोरा, आनंद समदडिया, डॉ. मयूर कटारिया, शुभम बोरा,सचिन बोथरा, मनीष बोरा, वर्धमान बोरा, पियुष दुधेडीया, पुष्पक पारख, पियुष पारख, निखिल पारख, अंकित जोगळ, व शुभम बोरा इत्यादीच्या सह्या आहेत यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलासराव कड, सामाजिक कार्यकर्ते रवीभाऊ सोनवणे,सतीश जाधव,जगन सताळे आदी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा