Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पासुन “गांव भेट समाधान शिबिर” महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पासुन “गांव भेट समाधान शिबिर” महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
बागलाण मधील ठेंगोडातुन शिबिराची सुरुवात ;शेतकऱ्यांनी तलाठी दीपक मोठे यांच्या कामाचे केले कौतुक
जिल्हातील १५ तालुक्यातून एकूण १४ टप्पे
सटाणा : महसूल प्रशासन गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख, करणे कामी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महत्वकाशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा – १ सुरु असून त्याअनुषंगाने जिल्हात आजपोवेतो एकूण ४१ मंडळात शिबिर यशस्वी झालेले असून आतापर्यंत २९७४७ योजनाचा लाभ देण्यात आला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या दौऱ्यात राज्यातून गांव पातळीवरुन मोठ्या प्रमाणात निवेदन प्राप्त झाल्याने शिबीराचे विस्तारीत स्वरूपात गांव पातळीपर्यत पोहचणेकामी जिल्हात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर विस्तारीत करून जिल्हातील मंडळ कार्यालय वगळून तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या गावांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पासुन “गांव भेट समाधान शिबिर” सुरू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे १५ तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकानिहाय गावांची यादीसह सदर कार्यक्रम दि. १५ एप्रिल ते २० मे पर्यत घेण्याचे नियोजन करण्यात आले असून आहेत.
समाधान शिबिरात पहिल्यापासुन आघाडीवर असलेल्या बागलाण तालुक्यातील गांव भेट समाधान शिबिराचे ठेंगोडा येथे जोरदार सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी महेश शेलार, बागलांणचे तहसीलदार कैलास चावडे, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार रविद्र पाटील, पूरवठा निरीक्षक विनायक कोळी, तसेच सटाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भेय्या सावंत, सटाणा मंडळ अधिकारी संतोष घोडेराव, ब्राम्हणगांव मनोज भामरे, ग्राम महसूल अधिकारी, दीपक मोठे, रोहित निकम, राजेश सुरवसे, ग्रामसेवक राजीव थोरात, ठेंगोडा सरपंच भारती वाघ, त्याचबरोबर महसूल विभाग, भूमी अभिलेख, पंचायत समितीचे सर्व अधिकारी - कर्मचारी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी देखील उपस्थित होते.
याप्रसंगी ठेंगोडा गावातील रेशनकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ई – मोजणी, ॲग्रीस्टॅक, दाखले , जातींचे दाखले, नॉन – क्रीमीलेयर ,जिवंत सातबारा उतारे , प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती,लोकसेवा हक्क कायदा, विविध नोंदी , विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना ,शासकीय विहीर वाटप, निराधार गावातील सर्व शेतकऱ्यांना ,नागरिकांना विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हंसराज सोनवणे, चंद्रकांत वाघ, गिरीश चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले. तलाठी मोठे यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले. सूत्रसंचालन मनोज भामरे आणि सतिश निकम यांनी केले.
ठेंगोडा तलाठी दीपक मोठे यांच्या कामाचे शेतकऱ्यांनी केले कौतुक तर अधिकाऱ्यांनी थोपटली पाठ...!
ग्राम महसूल अधिकारी ठेंगोडा दीपक मोठे यांचे शिबिरातील कार्यक्रमाप्रसंगी गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी, जेष्ठ नागरीक, अंध- अपंग यांनी गेल्या सहा महिन्यात गावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळून देत असून या समाधान शिबिरातून देखील अनेक लाभ मिळून देत असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी उपविभागीय अधिकारी महेश शेलार आणि तहसिलदार कैलास चावडे यांना माहिती दिली. लगेचच उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी तलाठी मोठे यांची पाठ थोपटत उपस्थित अधिकारी यांनी नागरिकांना मिस्तहास्य करीत आडनावातच नांव मोठे असल्याचे सांगत मोठे यांचे कौतुक देखील केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा