Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ एप्रिल, २०२६
Home
/
/
शिक्षणासोबत संस्कारांचीही जपणूक करा - खुर्दळ खतवड शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.
शिक्षणासोबत संस्कारांचीही जपणूक करा - खुर्दळ खतवड शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.
दिंडोरी ( प्रतिनिधी )
जिल्हा परिषद शाळा ही संस्कारांचे मंदिर आहे. सातवीपर्यंत या शाळेने तुम्हाला दिलेले ज्ञान आणि मूल्यांचे तुमच्या भविष्यातील प्रगतीचा पाया ठरणार आहेत. पुढील शिक्षणासाठी धैर्याने पावले टाका आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करा,असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपसरपंच सुकदेव खुर्दळ यांनी केले.
ते खतवड येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व पूजनाने करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर गावचे सरपंच बबन दोबाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.बी.आर. रोहम,आहिरे,पुष्पा कुमावत,स्वाती शिरसाठ,मंजुषा जाधव,संगीता ढोमसे,योगेश गायकवाड,विनोद जाधव तसेच अनेक पालक उपस्थित होते.
विद्यार्थी भावुक
निरोप समारंभादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेच्या आठवणींना उजाळा देताना अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.यावेळी वर्गशिक्षक योगेश गायकवाड यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल व शालेय साहित्य देऊन सन्मानित केले.आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मिष्ठान्न भोजन व कृतज्ञता
या विशेष प्रसंगी मुख्याध्यापिकांच्या वतीने सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोतीचूर लाडू तसेच विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनीही शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शाळेला भेटवस्तू अर्पण केली.
मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शन आणि अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणाने हा समारंभ उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा