Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२६
विल्होळी येथील प्राणघातक हल्ल्यातील संशयीत दाम्पत्यास अटक.
दिनांक १३/०४/२०२६ रोजी सायंकाळचे सुमारास नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत विल्होळी गावचे शिवारात इसम नामे सुरजकुमार मोहनलाल सोलंकी (जैन), रा. अमरधाम रोड, नामावली, जुने नाशिक यास कोणीतरी अज्ञात महिला व पुरुषाने मोबाईल वर झालेल्या बोलाचालीच्या कारणावरून त्यांचे हातातील लोखंडी कोयत्याने व दगडाने सुरजकुमार सोलंकी याचे दोन्ही हातावर, मानेवर, डोक्याचे पाठीमागील बाजुस गंभीर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणुन नाशिक तालुका पोलीस ठाणेस गुस्नं ७०/२०२६ भा. न्या. सं. कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा केल्यानंतर यातील संशयीत महिला व पुरुष यांनी अज्ञातस्थळी पलायन केले होते.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तात्काळ दखल घेवुन पोलीस पथकांना आरोपीतांचे शोधासाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या, तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदूला नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन घडल्या परिस्थीतीची बारकाईने पाहणी केली. तसेच यातील जखमी इसम सुरज सोलंकी याचे दैनंदिन कामकाज, पूर्व इतिहास व सध्याचे वास्तव्याबाबत गोपनीयरित्या माहिती घेवुन तपासाची चक्रे फिरवली असता, त्याचे अलिकडील कालावधीत एका महिलेशी वाद असल्याचे निदर्शनास आले होते. त्याप्रमाणे तपास केला असता, यातील महिला व पती हे दोघेजण घटना घडल्यापासुन फरार असल्याचे समजले, त्यावरून त्यांचा शोध घेतला असता त्यांना नाशिक व अहिल्यानगर जिल्हयाचे सीमावर्ती भागातील एका खेडेगावातून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी
१) हनुमंत आण्णासाहेब शिंदे, वय ४२, रा. अंधापुरी, ता. पाथरी, जि. परभणी, हल्ली विठाई नगर, नामको हॉस्पिटलच्या मागे, पेठरोड नाशिक २) साथना हनुमंत शिंदे, वय ३७, रा. पैठण, जि. छत्रपती संभाजी नगर, हल्ली विठाई नगर, नामको हॉस्पिटलच्या मागे, पेठरोड नाशिक यातील महिला आरोपी नामे साधना शिंदे हिचेकडे वरील गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता, सदर घटनेतील सुरज सोलंकी व आरोपी साधना शिंदे यांची दोघांची वाडीव-हे येथील एका कंपनीत ओळख झाली होती. तेव्हापासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते, कालांतराने सुरज सोलंकी हा साथना हिस ब्लॅकमेल करून, तिचेकडे अनैतिक संबंधाची मागणी करू लागला व तिस व तिचे परिवारास जिवे मारण्याची धमकी देत असल्याने, सदर गोष्टीचा राग मनात धरून साधना व तिचा पती हनुमंत शिंदे यांनी दोघांनी मिळून त्यास विल्होळी शिवारात बोलावुन, त्याचेशी झटापट करून त्याचे हातावर, मानेवर, डोक्याचे पाठीमागील बाजूस कोयत्याने व दगडाने गंभीर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदूला नाईक यांचे पथक करीत आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, नाशिक तालुका पो.स्टे. व्या पोनि मृदूला नाईक, स्थागुशाचे सपोनि नितीन रणदिवे, पोउनि प्रकाश भालेराव, पोउनि शैलेश पाटील, सपोउनि नवनाथ सानप, पोहवा प्रविण काकड, संदिप नागपुरे, रावसाहेब कांबळे, हेमंत गिलबिले, धनंजय शिलावटे, प्रदिप बहिरम, संतोष दोंदे, किशोर बोडके, नितीन गांगुर्डे, मपोहवा ललिता शिरसाठ, अस्मिता मढवई, तसेच नाशिक तालुका पोस्टे थे पोहवा निलेश मराठे, शितल गायकवाड, अनिल मुरडनर, प्रकाश वाजे, मंगेश पानझडे यांचे पथकाने वरील गुन्हा उघडकीस आपुन कामगिरी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा