Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
“खर्दे येथे उभारला जातोय आरोग्याचा महाकाय प्रकल्प! तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य उद्घाटन”
“खर्दे येथे उभारला जातोय आरोग्याचा महाकाय प्रकल्प! तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य उद्घाटन”
श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष व माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल तसेच सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने खर्दे बु. (ता. शिरपूर) येथे हे अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १२०० खाटांची सुविधा उपलब्ध होणार असून पहिल्या टप्प्यात ३५० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे.
या हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या आजारांवर उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असून देशातील नामांकित डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत. तसेच जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उद्घाटन सोहळ्यास मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजता शिरपूर विमानतळावर आगमनानंतर विविध विकासकामांचे उद्घाटन व पाहणी होणार आहे. यामध्ये एस.व्ही.के.एम. इंजिनिअरिंग कॉलेज, कृष्णा कोटेक्स (वर्ल्ड क्लास) डाय हाऊस, प्रथ टेक्सटाईल व एसेरोला प्रकल्प, नर्सिंग कॉलेज खर्दे यांचा समावेश आहे.
सायंकाळी ५.०८ वाजता तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज मैदान, शिरपूर येथे जाहीर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात विविध शैक्षणिक संस्थांचे व्हर्च्युअल उद्घाटन तसेच देवमोगरा माता मंदिर (नटवाडे) व इंटरनॅशनल मोटर ड्रायव्हिंग स्कूल (दहिवद) येथील भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर शिरपूर येथील जनकव्हिला येथे मुख्यमंत्री मुक्काम करणार आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा