Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
कॉलनी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार शेतकऱ्यांची पिंजरा लावण्याची मागणी.
कॉलनी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार शेतकऱ्यांची पिंजरा लावण्याची मागणी.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा (कॉलनी) येथे आज दि.१८ एप्रिल रोजी येथील शेतकरी वैभव गायकवाड यांच्या राहत्या घराजवळील डाळिंबाच्या भागात बिबट्याने पहाटेच्या सुमारास त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले.त्यामुळे या परिसरात पुन्हा शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच कॉलनी परिसरात राहणारे येथील शेतकरी चंद्रकांत सोनवणे यांच्या गाईवर हल्ला करून बिबट्याने गाईला ठार केले होते.त्याचीच प्रचिती पुन्हा येथील नागरिकांना शेतकऱ्यांना पहावयास मिळाले आहे.गाईला ठार करतातच पंचनामा करून वनविभागाने या ठिकाणी पिंजरा देखील लावला होता मात्र एक महिना उलटूनही या पिंजऱ्यात बिबट्या येत नसल्याने चार दिवसापूर्वीच कॉलनी परिसरातील पिंजरा वन विभागाने काढून निला.त्यानंतर आज पुन्हा या बिबट्याने या परिसरात येऊन एका कुत्र्याला ठार केले त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात असून सध्या या परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.तरी संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी येथील कॉलनी परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.
याआधीही या परिसरात वन विभागाला बिबटे पकडण्यात यश आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा