Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ मे, २०२६
Home
/
/
वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळ प्रकरण तापले; “स्वयंघोषित अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्षांचे काळे कारनामे उघड?” शासन अनुदान, बँक व्यवहार आणि बोगस कागदपत्रांवर संशय
वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळ प्रकरण तापले; “स्वयंघोषित अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्षांचे काळे कारनामे उघड?” शासन अनुदान, बँक व्यवहार आणि बोगस कागदपत्रांवर संशय
अमळनेर प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळ संचलित आश्रमशाळेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, स्वयंघोषित अध्यक्ष, सचिव व उपाध्यक्ष यांनी संगनमत करून संस्थेचा कारभार बेकायदेशीरपणे चालवत लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचे आरोप पुढे आले आहेत.
फिर्यादी गणेश स्वरुपचंद जाधव यांनी पारोळा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, संस्थेचे वैध कार्यकारी मंडळ अस्तित्वात नसतानाही काही व्यक्तींनी स्वतःला पदाधिकारी म्हणून सादर करत शासन, समाजकल्याण विभाग आणि बँकेची दिशाभूल केली. विशेष म्हणजे संस्थेच्या नावावरील बँक खात्यांमधून सरकारी अनुदानाच्या रकमा संशयास्पद पद्धतीने हाताळल्या गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या नावावर येणाऱ्या शासन अनुदानाचा अपहार करण्यात आला असून, बनावट कागदपत्रे, फेरफार अर्ज आणि खोटे ठराव यांच्या माध्यमातून संस्थेवरील नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संस्थेतील काही माजी व विद्यमान पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संगनमताने संपूर्ण कारभार आपल्या ताब्यात ठेवल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
विशेष म्हणजे २०१६ ते २०२६ या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. काही नियुक्त्या आर्थिक व्यवहारातून करण्यात आल्याचीही चर्चा असून, मुख्याध्यापक स्तरावरही संगनमत झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, “संस्थेचे अधिकृत मंडळ नसताना बँक व्यवहार कसे झाले?”, “बँक अधिकाऱ्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे व्यवहारांना मान्यता दिली?”, तसेच “शासन अनुदानाचे लेखापरीक्षण झाले का?” असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणात बँकेलाही चुकीची माहिती देऊन फसवण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर जोर धरत आहे.
वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेत ३०० हून अधिक निवासी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निधीचा गैरवापर झाला असल्यास हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता स्थानिक नागरिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे प्रतिनिधी:- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागातील अपंग युनिट समायोजन प्रकरणामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण आयुक्तालय...
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर आज एका थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने हादरून गेले आहे. महावीर सोसायटी परिसरात घडलेल्या या ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा