Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ जून, २०२६
Home
/
/
ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यस्तरीय अधिवेशन २० जूनला छत्रपती संभाजीनगर येथे भव्य आयोजन, विविध मान्यवरांची उपस्थिती.
ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यस्तरीय अधिवेशन २० जूनला छत्रपती संभाजीनगर येथे भव्य आयोजन, विविध मान्यवरांची उपस्थिती.
नाशिक ( दिंडोरी ) : महाराष्ट्र
राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन २० जून रोजी छत्रपती संभाजीनगर आदिती लॉन्स लाडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश दाभाडकर यांनी राज्यस्तरीय भव्य अधिवेशनाचे आयोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगर आदिती लॉन्स लाडगाव येथे शनिवारी (दि. २०) दुपारी दोन वाजता होणाऱ्या या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार तथा महाराष्ट्र राज्यकर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बच्चुभाऊ कडू उपस्थित राहणार आहेत. यावेळी युनियनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश दाभाडकर आणि राज्य कार्याध्यक्ष काझी अल्लादिन उपस्थित राहतील. या अधिवेशनामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यातीलही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष बापू केशवराव मोरे यांनी केले आहे. दरम्यान नाशिक जिल्हा कमिटी पूर्ण झाली असून कमिटी मध्ये बापू साहेब केशवराव मोरे अध्यक्ष,
महेंद्र मते सचिव,गणेश ठाकरे प्रसिद्धी प्रमुख,निसार भाई शेख उपाध्यक्ष,निलेश नवले उपाध्यक्ष,अशोक ढिकले उपाध्यक्ष,अण्णा साहेब महानुभव संपर्क प्रमुख,सुनिल नाठे कार्य अध्यक्ष,शुभानंद देवरे सह सचिव,सावकार लोखंडे कोषाध्यक्ष,शंकर साठे जिल्हा सल्लागार,
सुभाष पगारे जिल्हा संघटक, सोपान खिल्लारकर जिल्हा संघटक, मल्हारी गोईकने,रविभाऊ पवार जयराम भोये,नारायण वेताळ,मनोहर बेंडकोळी,वसंत खाडे,विद्याधर क्षीरसागर,इत्यादी ची कमिटी पूर्ण झाल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांनी केली
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा