Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ जुलै, २०२६

चांदवड लासलगाव रोडवर दिघवद शिवारात ३२ किलो गांजा जप्त.



माधव खाबिया :-

नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव व अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात आली आहे. दि.०४/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चांदवड परिसरात गस्त घालत असतांना, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार चांदवड बाजुकडून लासलगावच्या दिशेने एक पांढ-या रंगाचे स्विफ्ट कारमध्ये काही संशयीत इसम गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने चांदवड लासलगाव रोडवर दिघवद शिवारात सापळा रचुन एक सफेद पांढ-या रंगाचे स्विफ्ट डिझायर कारवर छापा टाकला. सदर कारमधुन खालील ०३ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले.१) संदिप रामनाथ सानप, वय ३६, रा. कानडी मळा, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक २) अनिल केशव बोडके, वय ३०, रा. मापाखाडी, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक ३) यश संदिप मोरे, वय २४, रा. कानडी मळा, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक या संशयीतांना विश्वासात घेवून त्यांचे कब्जातील स्विफ्ट डिझायर कार ची पंचांसमक्ष झडती घेतली असता, सदर कारचे डिक्कीमध्ये ३२ किलो वजनाचा गांजा मिळून आला. यातील ताब्यात घेतलेले संशयीत हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरित परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन कोठेतरी विक्री करण्याचे उद्देशाने अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आले असून त्यांचे विरूध्द चांदवड पोलीस स्टेशनला गुरनं २७६/२०२६ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीतांना वरिल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचे कब्जातून ३२ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, गुन्हयात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार क्रं एम एच ०१-बिटी -८८१३,मोबाईल फोन, व रोख रक्कम असा एकुण १४,७४,३००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास चांदवड पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे. अंमली पदार्थांची चोरटया पध्दतीने होणारी तस्करी व विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठानी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध