Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ जुलै, २०२६

साबद्रा परिवाराच्या वतीने पन्नास गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किटचे वाटप




प्रतिनिधी :- संतोष खाबिया

छत्रपती संभाजीनगर येथील असलेल्या श्री गुजराती विद्या मंदिर, खारा कुंवा, छत्रपती संभाजीनगर या शाळेला ॲड. देवेंद्र किशोर साबद्रा, किशोर साबद्रा, साधना साबद्रा यांनी या शाळेला भेट दिली असता भेटी दरम्यान पन्नास गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (स्टेशनरी) किटचे वाटप केले त्या मध्ये स्कुल बॅग, स्टेशनरी, इत्यादीचा समावेश असून विद्यार्थ्यांचे आनंदमय वातावरण होते शिक्षणासाठी अश्याच प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थीयांना शैक्षणिक मदत व्हावी या उद्देशानी त्यांना प्रेरणा मिळावी करिता पन्नास विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किटचे वाटप साबद्रा परिवाराच्या वतीने करण्यात आले या सामाजिक उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणकर मॅडम, शिक्षक शिवाजी जाधव सर तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय व मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यांच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल साबद्रा कुटुंबियांनी शाळेचे मनःपूर्वक आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध