Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १५ जुलै, २०२६
नाशिक ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई पिंपळगाव टोलनाका परिसरात ५३५ किलो गांजा जप्त.
संदीप अवधूत :-
नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव व अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुसार दि.१४/०७/२०२६ रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नाशिक बाजुकडून मालेगावच्या दिशेने एका पिकअप गाडीमध्ये काही संशयीत इसम गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून पिंपळगाव पोलीस ठाणे कडील पथकाने पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचुन पिकअप गाडी क्रमांक एम एच -०६-बि जि -१७७६ या वाहनावर छापा टाकला. सदर पिकअप मधुन खालील संशयीतास ताब्यात घेण्यात आले. १) राहुल शांताराम पाटील, वय ३३, रा. मुटकी ता. जि. धुळे वरील संशयीतास विश्वासात घेवून त्याचे कब्जातील पिकअप गाडी ची पंचांसमक्ष झडती घेतली असता, सदर पिकअप गाडी मध्ये ५३५ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. यातील ताब्यात घेतलेला संशयीत हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरित परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन कोठेतरी विक्री करण्याचे उद्देशाने अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आले असून त्याचे विरूध्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुरनं २०१/२०२६ एन.डी.पी. एस. कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीतास वरिल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचे कब्जातून ५३५ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, गुन्हयात वापरलेली पिकअप गाडी, मोबाईल फोन,व रोख रक्कम असा एकुण १,१२,१४,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाणेकडील अधिकारी करीत आहे.वरील प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग यांनी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदार यांचे पथकांनी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची चोरटया पध्दतीने होणारी तस्करी व विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
🔥 तरुण गर्जना स्पेशल रिपोर्ट 🔥 राज्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून, कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा