Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
निरोगी जीवनासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल आवश्यक,डॉ. जगन्नाथ दीक्षितदिवसातून दोनदाच आहार घेण्याचा आग्रह.
निरोगी जीवनासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल आवश्यक,डॉ. जगन्नाथ दीक्षितदिवसातून दोनदाच आहार घेण्याचा आग्रह.
बापू चव्हाण दिंडोरी:-
आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असून, निरोगी व आनंदी जीवनासाठी दिवसातून फक्त दोनच वेळा आहार, व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनचर्येचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध जीवनशैली तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.मोहाडी येथे श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमालेत ‘जीवनशैली’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.श्री अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान व कर्मयोगी कै.एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेतील हे पाचवे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता म्हणून माजी सरपंच कै. सुरेश तुळशीराम गावित यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले.डॉ.दीक्षित यांनी आपल्या व्याख्यानातून बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर होणारे परिणाम, योग्य सकस आहाराचे महत्त्व, नियमित व्यायाम,वजन नियंत्रण आणि दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी सवयी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जीवनशैलीत दिवसातून फक्त दोनदाच आहार घेण्यासह योग्य बदल केल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते,असा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी होते. यावेळी सह्याद्री ॲग्रो फार्मचे विलास शिंदे,निफाड तालुका वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण ठाकरे,तुळशीराम गावित उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमाला संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विलास देशमुख यांनी केले.सूत्रसंचलन धनंजय वानले यांनी तर आभार प्रा. धनंजय देशमुख यांनी मानले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा