Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख,आदिवासी विभागाचे पदाधिकारी व दिंडोरी -पेठ तालुक्याचे युवा नेते संतोष रेहरे यांना ठेवले पोलिसांच्या नजरकैदेत ही बाब बेकायदेशीरच.


संदीप अवधूत :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख,आदिवासी विभागाचे पदाधिकारी व दिंडोरी -पेठ तालुक्याचे युवा नेते संतोष रेहरे यांना  पोलिसांनी नजरकैदेत ठेवले ही बाब बेकायदेशीर असून गंभीर स्वरूपाची आहे आज मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस व नाशिक जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादाभुसे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, व अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, हे चाचडगाव येथे कृषी महाविद्यालयाच्या उदघाटन समारंभा प्रसंगी दिंडोरी तालुक्यातील दौऱ्यामुळे कुठलेही वाद निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख,आदिवासी विभागाचे पदाधिकारी व दिंडोरी -पेठ तालुक्याचे युवा नेते संतोष रेहरे यांना वणी पोलीस स्टेशनंच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या समक्ष नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.संतोष रेहरे यांनी जनहितासाठी, शालेय विद्यार्थी, शेतकरी बांधवांसाठी
मागील काळात राज्यांचे तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या कळवण तालुका दौरा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वतीने वणी चौफुली येथे कांदा व टोमॅटो फेकून निषेध नोंदविले होते. त्याच कारणाने यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दिंडोरी दौऱ्या वेळी अनुचित प्रकार घडू नये किंवा महायुतीच्या सरकारने याची धास्ती घेतली का किंवा कसे म्हणूनच शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी संतोष रेहरे यांना वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी नजरकैदेत ठेवले का यावरून निदर्शनास येते कि सत्य बोलणाऱ्याचे नेहमी तोंड बंद करण्याचे काम हे सरकार करत असल्याचे दिसून येते सामान्य जनतेला न्याय देणाऱ्या या पदाधिकारी ला असे नजर कैदेत ठेवणे कितपत योग्य आहे हे असंविधानक बाब आहे संविधानाने सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी संविधान लिहिले त्या संविधानाप्रमाणे संतोष रेहरे यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्णपणे अधिकार असतानाही त्यांचे अधिकारांची पायमल्ली करणारे हे सरकार कोण ? सत्य हे कडू असत सत्य गुण देणार औषध असत परंतु ते दाबण्याचा प्रकार हा बेकायदेशीर आहे.                

संतोष रेहरे यांच्या प्रमुख मागण्या 

खालील प्रमाणे.

) आमचे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आंदोलन करतात त्यांना तूर्तास स्थगिती दिली तो शासन निर्णय कायमचा हटवण्यात यावा.
 
२) अनुसूचित जमातीचे तीन मुली सर्पदअंशाने मयत झाले तसेच 485 आकडेवारी चुकीची दाखवली शासनाने विद्यार्थी व विद्यार्थिनींना योग्य व पूरक योजना द्यावी व वस्तीगृहाचे सुधारणा चांगल्या प्रकारे करावी. 

३) शेतकऱ्यांना झालेली कर्जमाफी ही तुटपुंजी स्वरूपाची असून शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्णपणे कोरा झालाच पाहिजे. 

४) नाशिक कुंभमेळ्यासाठी शासनाने तीस हजार कोटी खर्च मंजूर केला असून त्यापैकी नाशिक ते कळवण या रस्त्याला सुमारे बाराशे कोटी निधी देण्यात आला . परंतु संबंधित जे रस्ते बांधले खरंच ते बाराशे कोटीचे आहे का याची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी. 

५) दिंडोरी पेठ तालुक्यात शासनाने जे कामे केले ते योग्य पद्धतीनी केले का याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध