Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६
जनतेला लुटणाऱ्यांचा देश.
क्रांती झाली आणि भारतात जनता आनंदी झाली. इंग्रज देश सोडून गेलीत? का तर भारतीय जनता ब्रिटिशशाई विरोधात एकवटली होती. जनता स्वराज्य सुराज्य जे राजे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी मना मनात रुजवलं होतं. पण तत कालीन राजे गेल्या नंन्तर. पानिपत नंन्तर राजेशाही खिळखिळी झाली अन ब्रिटिश कंपनी नं भारतात पाय पसरले. व्यापारी म्हणून आलेत अन राज्यकर्ते झाले. अगदी तसंच लोकशाही आली अन लोकशाही मध्ये सालदार म्हणतं म्हणतं जनसेवक म्हणून जनतेला लुटणारे मालक झाले. फक्त फरक इतका पडला दर पाच वर्ष्यानी लुटणारे बदलतात असंच आहे. मोठया विश्वासाने क्रांतिकारी लोकांनी क्रांती घडवून आणली अन स्वराज्य सुराज्य स्वप्न बघितली पण ती सारी जनतेची स्वप्न धुळीला मिळताना दिसतं आहे.देश गुलामीत गेला त्या दिवसा पासून देश परकीय जोखटातून सोडवण्या साठी जनता झटली. लहान असो वा मोठी माणसं असो जो तो ज्याच्या त्याच्या परीने झटला. इंग्रज लोकांनी दिलेली नोकरी ज्यांनी स्वीकारली ते कुटुंब सोडुन पण त्यांच्याही मनात गुलामी गेली पाहिजे असं होतं. अनेक उठाव झालीत इंग्रज राजवट विरोधात. नंन्तर काँग्रेस या संघटनेच्या माध्यमातून क्रांती वादळ जोरात सुरु झालं. त्यातही जहाल आणि मवाळ गट पडलेत पण ध्येय एक होतं. सर्व काँग्रेस चे होते नंन्तर नंतर बऱ्याच क्रांतिकारी संघटना निर्माण झाल्या सर्वांचे उद्धीष्ट एक "स्वातंत्र्य " महात्मा गांधी आणि सुभाषचंद्रभोस विचार धारा वेगळ्या पण मित्र ध्येय म्हणून एक होते. महात्मा हि पदवी नेताजी यांनी दिली तर नेताजी हि पदवी गांधींजी यांनी दिली. असे पूर्वी नेते होते. देशात अंनत नेते त्यांच्या विचारावर चालणारे होऊन गेलेत. सर्व जनतेचं योगदान होतं स्वतंत्र लढ्यात. जो तो ज्याच्या त्याच्या परीने लढला. दोघंहि या क्रांतिकारी प्रवाहा मुळे स्वतंत्र मिळालं. नंन्तर लोकशाही आली आणि लोकांचं राज्य खऱ्या अर्थाने सुरु झालं. सुरवातीला जनता आणि नेते निस्वार्थी प्रेमळ जनहित विचार करून निर्णय घेतं असतं. देशात मूलभूत सुविधा नव्हत्या त्या हळूहळू आणल्यात. देशाचा विकासाचा पाया रचला गेला. देश सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस, राज्य पोलीसदल , केंद्रीय पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, पायदळ,हवाई दळ, आरामार मिल्ट्री उभ्या झाल्या. सुई पासून ते रेल्वे पर्यंत निर्मिती देशात होऊ लागली. रेल्वे जाळे जगात मोठं भारतात उभं स्वतंत्र नंन्तर झालं. विज्ञान तंत्र ज्ञान टीव्ही पर्यंत आलं. विमान,यान, जहाज निर्मिती ते मिसाईल निर्मिती होऊ लागली. शेती साठी मोठ मोठी धरण,रस्ते, दवाखाना, शाळा, विद्यापीठ, बॅंक, वीज, अश्या अंनत सुविधा वानवा होता तो इंग्रज गेल्या नंन्तर विकास झाला. शून्य नव्हे पण अगदी कमी विकास होता तो विकास पूर्वी लोकशाही नं आणला .देशात जनते कडे पैसा नाही म्हणून उधोग सुद्धा सरकारी उभा राहिला.सरकारी बॅंक आणल्या अश्या पद्धतीने जनतेनं जनतेसाठी कारभार सुरवातीच्या काळात झाला. नेते प्रामाणिक जनता प्रामाणिक होती दोघं सुखी होतं होते.
स्वतंत्र नंन्तर साधारण 40 वर्ष्या नंन्तर असं आपण मानु.भ्रष्ट गुंड, धूर्त, खोटारडी, स्व हित साधनारी संधीसाधू, दृष्ट स्वहित बघणारी लोकं हळूहळू राजकीय वातावरणात शिरलीत अन लोकशाही अधोगती कडे सुरवात झाली असंच मला वाटतं. आज स्वतंत्र मिळून जवळ जवळ 80 वर्ष झाली पण पहिली 40 वर्ष मध्ये ज्या सोई सुविधा जनतेनं निवडून दिलेल्या नेत्यांनी आणल्या त्या नंन्तर च्या 40 वर्ष्यात त्या साऱ्या योजना स्व घश्यात घालण्याचे पाप करणारे पापी काही लोकं निवडून येऊ लागलेत. देशातील अंनत संस्था एकतर विकल्या किंवा त्या बंद करून समांतर दुसऱ्या स्वतःच्या संस्था उभ्या केल्या हया दृष्ट,भ्रष्ट, पापी नेत्यांनी.साऱ्या साऱ्या पूर्वी सरकारी संस्था डुबतील कश्या हे बघायचं अन स्वतः तश्या संस्था उभ्या करायचं हे धोरण गेल्या काही वर्ष्या पासून हळूहळू पाया रचला गेला काही दृष्ट नेत्यांच्या कडून. शाळा, कॉलेज, दवाखाना, रस्ते, वीज प्रकल्प, रेल्वे, बॅंक, सुरक्षा संस्था, ऑइल तेल संस्था,अगदी माणसाची लस बनवण्याची संस्था ह्याच लोकांनी बुडवल्यात अन दुसऱ्या खाजगी स्वतःच्या कश्या उभ्या राहतील हेच बघितलं हया काही जनता लुटारू नेत्यांनी. खाजगी करण हे वरून गोड्स नाव दिलं अन सरकार बुडवत खाजगी उभं करु लागलेत. अगदी रस्ता सुद्धा यांच्या बापाचा आहे असं समजतं रस्त्यावर वापरायचं असेल तर पैसे भरा मग वापरा नाहीतर जा घरी. हि कुठली नीतिमत्ता आहे. जनतेनं गाडी विकत घेतली तेव्हा आणि दरवर्षी रोड टॅक्स तर भरलाय ना?मग हि खाजगी रस्ता बनवण्या देऊन डबल का वसूल करतात लुटारू. जनतेला खोटं कारण सांगायचं सरकार कडे रस्ता बनवण्या साठी पैसा नाही म्हणून खाजगी बनवण्या दिलाय तर त्याला वसूल करू दया. लबाड खोटारडे खरं तर ह्याच नेत्यांनी त्यांच्या काळ्या पैश्यातून रस्ता बनवतात किंवा एखाद्या त्यांच्या मर्जीतील कपंनी ला देतात अन रस्त्यावर रस्तालूट करतात. हे करायचं तर रोड कर वसूल करु नका ना मग? शाळा तसंच सरकारी बंद खाजगी जोरात सुरु, सरकारी तेल डेपो बंद खाजगी त्यांचा तेल डेपो जोरात सुरु. सरकारी एसटी बंद खाजगी त्यांच्याच सुरु.सगळं सगळं विकून एकतर स्वतः कडे वळवायचं किंवा विकून स्वतः तसे उदयोग सुरु करायचा.वीज कपंनी सरकारी बंद खाजगी यांच्या सुरु. तुमी बघा जो ज्या खात्याचा मंत्री त्या खात्याशी सबंधित त्यांची अलीकडे उधोग उभा राहतो. किंवा तेथून पैसा काढून दुसरा उधोग उभा करतात भ्रष्ट्राचारी असंच आहे सध्या भारतात उलटफेर सुरु झाला. पहिल्यांनी निर्मिती केली नंन्तर च्यांनी ती निर्माण झालेली देशाची स्थिती स्वतः कडे खाजगीत वर्ग करण्यास सुरवात केली.सगळं देश जनतेची संपत्ती कोणताही उधोग या लोकांनी सोडला नाही. सरकारी जागा सुद्धा फुकटात मिळवता कवडीमोल भावाने एक रुपयात 99 वर्ष कराराने घेता म्हणजे फुकट गोंडस असं लोकहीत, जनते साठी, देशसेवा म्हणून काहीतरी कारण सांगून फक्त अन फक्त लुटायचं असंच दिसतं. देश देशातील संम्पती आपली कशी होईल हेच बघायच असंच धोरण गल्ली ते दिल्ली पर्यत नेते मंडळी यांचे. "जनता मरो पण आपण आपलं कुटुंब सुखी करो " हा एकमेव नारा भारतीय नेत्यांनी दिलेला दिसतो पण तो ते स्वतः मनात देतात. ओठावर मात्र जनहित साधण्यासाठी हा निर्णय घेतला. लोकांच्या कल्याण साठी कल्याणकारी निर्णय असं म्हणायचं. विकास स्वतःचा करण्या साठी जनतेला लुटून घेतात पाच वर्ष्यात. "वाटून निवडून आलोय तर लुटून जाऊ." हा त्यांचा मंत्र झालाय.साम,दाम, दंड भेद, लूट, छळ,चोरी,मारणं, संम्पवणे,फोडा, झोडा भांडणं लावा जाती,पंथ, धर्म यांच्यात लढाया उभ्या करा हा हातखंडा झालाय नेत्यांचा असंच वाटतं. नेता सांगेल तसं जनता वागते. कारण जनतेला लाचार केलं हया राजकीय गुंड लोकांनी आवाज निघु देत नाही हे जनतेचा. सारी सरकारी यंत्रणा स्वतःच्या दावणीला बांधत असता हि लोकं.
जनतेवर अतोनात कराचा बोजा लादायचा आणि खिसा खाली करायचा अन वरून दान धर्म आव आणत देशातील जनतेला 100 पैकी 80 लोकांना फुकट धान्य, अश्या अनेक योजना राबवतात नेते सरकारी योजना माध्यमातून देतात का तर जनतेला मदत म्हणून. म्हटले तर मदत म्हटलं तर दान. का पाळी येतेय सरकार वर असं वाटप करायची तर देशातील जनता पिळली लुटली कंगाल केली म्हणून अन्नदाता भिकेला लावला त्यालाच धान्य भीक म्हणून देता हि जगातील खूप मोठी शोकांतिका आहे. की इतक्या लोकांना फुकट वाटप करणारा देश अगदी मूर्ख पण सगळा असंच दिसतं.हया विविध योजना पासून फायदा दयायचा. का तर देशातील जनता कर माध्यमातून पैसा इतका भरते की तिला स्वतः खायला उरतं नाही म्हणून तिच्यावर सरकार कडे पाहण्याची वेळ. जनतेला मूर्ख बनवतात हि राजकीय लोकं उधोगपती कर भरतो पण उधोग करणारा कधीच कर भरत नसतो. वस्तु विकली जनतेने घेतली कि जनता कर भरते. पण दिशाभूल करायची लोकांची. अन जनता लुटायची अन जनतेला त्यांचेच पैसे त्यांना सरकारी योजना नावानं दयायच्या. बाकी उरलेलं सगळं देशाची संपत्ती विविध मार्गानं विविध नेत्यांनी सरकारी खजिना लुटत राजकारण करायचं. भारत देशात प्रेत्येकाला सर्व साधन काहीतरी हवं मग काही का करणं होई ना म्हणून देशात गरीब गरीब होतं चालला पैसे वाला श्रीमंत होतं चालला. हि सारी सारी देणं नितिशून्य राजकारण करणाऱ्या राजकीय लोकांनी लोकशाही ला कलंकीत केलं.
आज देशात देश संपत्ती लुटायची अन खाजगी मालमत्ता वाढवायची ओढ लागलेली दिसते. अंनत मुद्धे आहेत देश लुटारू कसे लुटताय त्याचे पण थोडक्यात मांडतो. लुटारू पासून जनतेनं सावध होतं. निस्पृह जनसेवा करणारा जन हिताचे निर्णय घेणारा आपल्यातून चांगलं नेतृत्व निर्मिती केली पाहिजे.जी निस्वार्थी जनसेवक असली पाहिजेत. नेहरू, शास्त्री, पटेल,चंद्रशेखर, अनेक नावं घेता येतील तसेच राजे छत्रपती सारखं रयतेचा विचार करणारी नेताजी आणि महात्मा, साने गुरुजी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाल शिरीष कुमार या सारखी असंख्य क्रांतिकारी यांना अभिप्रेत लोकशाही देशात रुजली पाहिजे. असं नेतृत्व सर्व्हिकडं गल्ली ते दिल्ली जन्मले पाहिजे देशात जे देश हीत ते माझं हीत. तरच अन तरच देश सुरक्षित राहु शकतो नाहीतर परत गुलामी कडे या खाजगी माध्यमातून वाटचालीस सुरवात झालीय असंच वाटतं.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया :- सोन्याचे खोटे नाणे देऊन फिर्यादीची ५,००,०००/- रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत कर...
-
माधव खाबिया :- महामार्ग पोलीस केंद्र, पिंपळगाव बसवंत व संघर्ष ग्रुप, पालखेड यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताहानिमित्त ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा