Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ सप्टेंबर, २०२६
Home
/
/
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या ‘इराणी गँग’वर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई; पती-पत्नी ताब्यात, ₹७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या ‘इराणी गँग’वर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई; पती-पत्नी ताब्यात, ₹७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
🚨🔴 ब्रेकिंग न्यूज | शिरपूर
शिरपूर : महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार होणाऱ्या सराईत चोरट्यांविरुद्ध शिरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. आशु उर्फ हसन अली नियाज अली इराणी आणि त्याची पत्नी फातिमा हसन अली इराणी यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी एकूण ₹७५ हजार रुपये किमतीचे तीन सोन्याचे लगड, एकूण ३० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती धुळे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकातून समोर आली आहे.
शिरपूर शहरातील चेन स्नॅचिंगनंतर तपासाला वेग
दि. २४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता शिरपूर शहरातील कॉलनी परिसरात ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोन अनोळखी इसमांनी काळ्या रंगाच्या बुलेट मोटारसायकलवरून येत हिसकावून नेले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.
भुसावळपासून फैजपूरपर्यंत पोलिसांचा पाठलाग
तपासादरम्यान या गुन्ह्यात आशु उर्फ हसन अली नियाज अली इराणी, रा. पापा नगर, रजा टॉवरजवळ, भुसावळ, जि. जळगाव आणि त्याचा साथीदार सादिक अली इबादत अली इराणी यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पथकाने भुसावळ येथे जाऊन सलग तीन दिवस संशयिताचा शोध घेतला. पोलिसांचा शोध सुरू असल्याचा सुगावा लागताच आशु भुसावळहून फरार झाला. त्यानंतर तो फैजपूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने फैजपूर गाठले. मात्र, पोलिसांचा माग काढत असल्याचे लक्षात येताच तो पुन्हा तेथून पसार झाला.
अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढत मुक्ताईनगर तालुक्यातील बिस्मिल्ला हॉटेल परिसरात वेषांतर करून सापळा रचला. संशयित आशु उर्फ हसन इराणी दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चोरलेल्या सोन्याचा तपास करताना पत्नीचाही सहभाग समोर
चौकशीत आशुने चोरीचे सोने भुसावळ येथील ओम जयबहादूर ठाकूर याच्याकडे विकल्याची माहिती दिली. पुढील तपासात चोरीच्या दागिन्यांपासून तयार करण्यात आलेल्या सोन्याच्या लगडी पोलिसांनी हस्तगत केल्या.
तसेच चोरीतील मंगळसूत्र त्याची पत्नी फातिमा हसन अली इराणी, वय २२ वर्षे, रा. मुस्लिम कॉलनी, खडका रोड, भुसावळ, जि. जळगाव हिच्याकडे ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी फातिमालाही ताब्यात घेतले.
₹७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात—
₹१४,००० किमतीची ७ ग्रॅम सोन्याची लगड
₹१६,००० किमतीची ८ ग्रॅम सोन्याची लगड
₹४५,००० किमतीची १५ ग्रॅम सोन्याची लगड
असा एकूण ₹७५,००० किमतीचा आणि ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
आरोपीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आशु उर्फ हसन अली इराणी याच्याविरुद्ध धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, चंद्रपूर, नाशिक, अमरावती आदी जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची नोंद प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिरपूरमधील चेन स्नॅचिंगच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
या पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे
उपविभागीय अधिकारी श्री सुधीर पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोउनि. जितेंद्र महाजन तसेच पोलीस अंमलदार रविंद्र आखडमल, अतुल पाटील, आरिफ तडवी, सचिन वाघ, गोविंद कोळी, मनोज महाजन, योगेश दामाडे, विनोद आखडमल, भटू साळुंके, मनोज दामाडे, प्रशांत पवार, सोमा ठाकरे व निलेश चौधरी यांच्या पथकाने केली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शिरपूर शहरातील चेन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले असून, इतर जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा तपासही पुढे जाण्याची शक्यता आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया :- फिर्यादी- राजाराम सिताराम शेलार वय ६५ वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. प्लेंट न. ५०९, पाचवा माळा, जय अंबे हाऊसिंग सोसायटी, दत्...
-
“आपल्या भागात व्हरायटी पहिल्यांदाच स्टार्टअप करते आहे… मग हे वाण कसे असेल?” हा प्रश्न आपल्या अनेक शेतकरी बांधवांच्या मनात नक्कीच आला असेल. म...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा