Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६
Home
/
/
अभोणा पोलिसांची धाडसी कारवाई पैशांचा पाऊस पाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल - सपोनि योगिता कोकाटे यांचे कौतुकास्पद काम.
अभोणा पोलिसांची धाडसी कारवाई पैशांचा पाऊस पाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल - सपोनि योगिता कोकाटे यांचे कौतुकास्पद काम.
फिर्यादी- राजाराम सिताराम शेलार वय ६५ वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. प्लेंट न. ५०९, पाचवा माळा, जय अंबे हाऊसिंग सोसायटी, दत्तापाडा रोड, राजेंद्रनगर बोरीवली पूर्व यांनी दिलेल्या फिर्यादित आरोपी-१) हिराचंद शिवाजी बर्डे (बाबा) रा. पिंपळे खुर्द ता. कळवण
२) रामचंद्र शिवाजी बर्डे रा. पिंपळे खुर्द ता. कळवण,३) विशाल पवार (दाढीवाला), पूर्ण नाव गाव माहीत नाही.
४) सुमित्रा संजय बडे, रा. पिंपळे खुर्द ता. कळवण
५) रविंद्र विजय पवार,
६) सोमनाथ बारामते रा. धामणवन, राजूर जि. अहिल्यानगर,७) चिंतामण चौरे, यांनी दि. ०१/०४/२०२६ ते दि. २८/०४/२०२६ रोजी पावेतो वेळोवेळी पिंपळे खुर्द ता.कळवण येथे हिराचंद शिवाजी बर्डे याचे राहते घरात दि.१०/०९/२०२६ रोजी अपहार रक्कम केला असून अपहार रक्कम खालीलप्रमाणे १) ४,२०,०००/- रोख रुपये ५०० रुपये दराच्या चलनी नोटा.,२) २,२०,०००/- रविंद्र विजय पवार याचे खात्यावर ऑनलाईन पाठविलेले, ३) ५,५५,०००/- सुमित्रा संजय बर्डे हीचे खात्यावर पाठविलेले असे एकूण ११,९५,०००/- (अकरा लाख पंच्याण्णव हजार रुपये) रुपयांचा अपहार केला असून पैकी आरोपी न- ६ व ७ यांचे खात्यावर ०१ लाख रुपये आले
फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक रक्कम १०,९५,०००/- झाली
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर यांनी संगणमत करुन आरोपी क्रमांक ०१ हा बाबा असून तो पुजा पाठ करुन दिलेल्या पैशांचा पाऊस पाडून पैसे १० पट करुन देतो अशी बतावणी करुन त्यांचे समक्ष अघोरी विधी व जादुटोणा, पुजा करुन त्यांना पैशाचा पाऊस पाडून दाखवून फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन सुरवातीला फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून ४,२००००/- रोख रुपये घेवून त्याबदल्यात १५ करोड रुपये करुन देतो असे सांगून, पुजा पाठ करुन फिर्यादी व साक्षीदार यांना ०३ करोड रुपयाचा पाऊस पडला आहे असे सांगून त्यांना एका नारंगी गाठोड्यात पैस बांधुन दिले व घरी जावून याची सात दिवस पुजा करा ते अगोदर उघडून पाहू नका नाहीतर कोप होईल असे सांगितले होते. व बाकी पुजा अजून बाकी आहे त्यासाठी आरोपी न- ५ रविंद्र विजय पवार याच्या खात्यावर २,२०,०००/- ऑनलाईन घेतले त्यानंतर आरोपी न- १ यांनी सांगितल्याचे कालावधीच्या अगोदर फिर्यादी यांची काकू मयत झाल्याने परत शुध्दीकरण पुजा करावी लागेल त्यासाठी दि.१५/०४/२०२६ ते दि. २६/०४/२०२६ या कालावधीत आरोपी न- ०४ सुमित्रा संजय बर्डे यांचे खात्यावर ५,५५०००/ रुपये ऑनलाईन पाठविले होते. त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांना शंका आल्याने त्यांचेकडे दिलेले नारंगी रंगाचे गाठोडे खोलून पाहीले असता, त्यामध्ये असलेल्या बंडलची पहीली नोट खरी व त्याखलच्या सर्व बनावट नोटा असल्याने फिर्यादी व साक्षीदार यांची १०,९५,०००/- रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात
आल्याने त्यांनी पोलीस ठाणेस दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
सपोउनि एस. एम. चौधरी नेम. अभोणा पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल केला असून तपासास भेट पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे अभोणा पोलीस ठाणे यांनी दिली असून पुढील तपास अभोणा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे ह्या करीत आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- माळेगावकाजी (दिंडोरी ): - गावाच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असताना प्रत्यक्षात गावाच...
-
बनावट शालार्थ आयडीच्या आधारे शिक्षक-कर्मचाऱ्यांना वेतन मंजूर करून शासनाच्या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून अन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा