Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६
Home
/
/
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया आठवले पक्षाचा ३ ऑक्टोबरला वाशी येथे ६९ वा वर्धापन दिन सोहळा.. महाराष्ट्रातील रिपाई व बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रिपाईचे युवा नेते संदिपभाऊ गवई यांचे आवाहन..
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया आठवले पक्षाचा ३ ऑक्टोबरला वाशी येथे ६९ वा वर्धापन दिन सोहळा.. महाराष्ट्रातील रिपाई व बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रिपाईचे युवा नेते संदिपभाऊ गवई यांचे आवाहन..
बुलढाणा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रांवर स्वाक्षरीने तयार झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चा ६९ वा वर्धापन दिन सोहळा ३ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून रिपाई चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्यांची माहिती पक्षाचे युवा नेते संदिपभाऊ गवई यांनी प्रसिद्धीपत्रकावाद्वारे दिली आहे.
रिपाई पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार लोकनेते दलितांचे हृदयसम्राट डॉ. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन सोहळा हा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे. तरी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. पक्षाचा विचार आणि ध्येयधोरणे घराघरात पोहोचविण्यासाठी या मेळाव्याला राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी विचारांच्या जनतेने आणि रिपाईच्या बुलढाण्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्यांचे आवाहन संदिपभाऊ गवई यांनी केले आहे..
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया :- वडिवऱ्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 283/2026 bNS 118[1] 351[2] आर्म act मधील गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना...
-
माधव खाबिया :- महामार्ग पोलीस केंद्र, पिंपळगाव बसवंत व संघर्ष ग्रुप, पालखेड यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताहानिमित्त ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा