Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

चैन स्नॅचिंग/सोन साखळी चोरी करणारा सराईत गुन्हेगार सायखेडा पोलीस ठाणे च्या जाळयात.



संदीप अवधूत :- 
नाशिक ग्रामीण जिल्हयातील चेन स्नॅचिंगचे ०४ गुन्हे व ०१ मोटार सायकल चोरी उघकीस आणण्यास पोलिसांना यश
मागील काही दिवसांपासुन नाशिक ग्रामीण जिल्हयातील विविध ठिकांणावर जाणाऱ्या व शेतात काम करणाऱ्या महिलांवर पाळत ठेवुन त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिणे ओरबडुन जबरी चोरी (चेन स्नॅचिंग) केल्याचे गुन्हयांमध्ये वाढ झालेली होती. सदर गुन्हयातील आरोपी हा दुचाकी वर येवुन चोरी करून भरधाव वेगाने पलायन करत होता. वरील घटनांना प्रतिबंध होण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डि एस स्वामी यांनी चेन स्नॅचिंग प्रवण भागात पेट्रोलिंग व नाकाबंदी पॉइंटस लावुन गुन्हेगारांचा सतर्कतेने शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार सायखेडा पोलीस ठाणे कडील चेन स्नॅचिंग गुन्हयातील तपासात सायखेडा पोलीस ठाणे कडील अंमलदार हे खाणगाव थडी परिसरात गस्त घालत असतांना सहा. पोलीस निरीक्षक सागर सुरेश आव्हाड यांना व पो.हवा १२७८ मंगेश गोसावी यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वरील चेन स्नॅचिंग चे गुन्हयातील आरोपीच्या वर्णनाप्रमाणे मांजरगाव येथुन खाणगाव थडी गावाच्या दिशेने लाल रंगाच्या युनिकॉर्न मोटार सायकल काळया रंगाचे हेल्मेट घालुन वर भरधाव वेगाने येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्याप्रमाणे सायखेडा पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ नाकाबंदी करून खाणगाव परिसरात हॉटेल झोपडी येथे सदर संशयीतास पकडले असता त्याचे नाव सचिन सुदाम ढेपले वय ४० वर्षे, रा. ढेपले वस्ती, नांदुर्डी रोड, निफाड जि. नाशिक असे सांगितले तसेच त्यास सखल चौकशी केली असता त्याने सायखेडा येथील नागापुर व तळवाडे शिवार येथे तसेच वडांगळी शिवारात व पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली.
१) सायखेडा पोलीस ठाणे गु.र.नंबर २२५/२०२६ भा, न्या. सं.२०२३ चे कलम ३०४ (२) २) सायखेडा पोलीस ठाणे। गु.र.नंबर १८६/२०२६ भा. न्या. सं.२०२३ चे कलम ३०४ (२) ३) एम.आय.डी.सी. सिन्नर पोलीस ठाणे। गु.र. नंबर ३२८/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०४ (२)
४) पिंपळगाव पोलीस ठाणे गु.र.नंबर २५७/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०४(२) ५) वणी पोलीस ठाणे। गु.र.नंबर २४८/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) सदर आरोपीतांचे कब्जातुन अद्यापपावेतो ५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगडी तसेच गुन्हयात वापरलली युनिकॉर्न मोटार सायकल, व तीन मोबाईल फोन असा एकुण :- ८ लाख चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे सचिन सुदाम ढेपले वय ४० वर्षे, रा. ढेपले वस्ती, नांदुर्डी रोड, निफाड जि. नाशिक ओरोपीतावर यापूर्वी निफाड पोलीस ठाणेस खालील ०३ गुन्हे दाखल आहे.१) निफाड पोलीस ठाणे। गु.र. नंबर १५४/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३३१ (४),६२,३२४,११५
२) निफाड पोलीस ठाणे । गु.र. नंबर १३५/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ५०३
३) निफाड पोलीस ठाणे गु.र.न ३५/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३३१ (४),६२,३२४,११५ सदर गुन्हयात खालील प्रमाणे आरोपी निष्पन्न झाले आहे. आरोपीचे नाव
सचिन सुदाम ढेपले वय ४० वर्षे, रा. ढेपले वस्ती, नांदुर्डी रोड, निफाड जि. नाशिक
आरोपी (सोनसाखळी चोर)
अजय रमेश कुलथे वय ४६ रा. डी ५, शिमंगल पॅरडाईज, इंदिरानगर, नाशिक आरोपी (सोने खरेदी करणारा सोनार),घनश्याम निवृत्ती लोंढे वय ५८ वर्ष, रा सावतानगर, सिडको नाशिक
आरोपी (आरोपी कडुन सोने स्विकारणारा सोनारा कडील कामगार) नाशिक जिल्हयातील चैन स्नॅचिंग गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक. डि एस स्वामी तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांनी केलेल्या मार्गदर्शन व उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या सुचनांप्रमाणे सायखेडा पोलीस ठाणे चे सपोनी सागर सुरेश आव्हाड, पो. उपनिरी. अशोक मोकळ, पो. उपनिरी. तांदाळकर, मपोउपनिरी. निकीता खडेकर , पो.हवा मंगेश गोसावी, पो.हवा जितेंद्र पाटोळे, पो.हवा जयंत जगताप, पो.हवा अजय पगारे, पो.हवा प्रदिप भाबड, पो.हवा. अमोल भाबड, पो.ना. एम.जाधव, पो.ना.संतोष माळोदे, पो.शि. संदिप लगड, पो.शि.दिपक सानप, पो.शि. जितेंद्र मुकणे, पो.शि. मिलींद शिरसाठ व तात्रींक विश्लेशन विभाग येथील पो. हवा हेमंत गिलबीले यांनी सदरची कामगिरी केली आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध