
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या प्रतिक्रियेसाठी मोबाईल केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता.
अमळनेर (प्रतिनिधी) गणेश चव्हाण
तालुक्यातील सारबेटे येथील ८ ते १० शेतकऱ्यां दुष्काळ निधीचा धनादेश देण्याबाबत भ्रमणध्वनी वरुन तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे हया बोलल्या नाहीत म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी च्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील गेल्या असता त्यांना हीन वागणूक देऊन त्यांच्याशी अर्वाच्य भाषा वापरून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली म्हणून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी आयोजीत पत्रकार परिषदेत केली.
आज दि १९ रोजी सकाळी ११.३० वाजेपूर्वी तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन दोन वेळा कॉल केला मात्र त्यांनी तो उचलला नाही म्हणून स्वतः सारबेटे येथील दोन तीन शेतकरी सोबत दुष्काळ निधी च्या धनादेश देण्याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याशी बोलत असतांना त्यांनी मला हीन वागणूक देत अरवाच्च भाषा वापरून अपमान केला व त्यांना मी एव्हढेच सांगितले की सदर शेतकऱ्यांचे धनादेश ८ दिवसापासून तयार होवून तुमच्या टेबला वर पडून आहेत ते दया व मि शेतकऱ्यांच्या कामासाठी आली आहे तरी ते त्यांचा खाजगी फोन हातात घेवून माझी व्ही. डी.ओ.शुटींग करू लागल्या व शिपायाला बोलावून सी.सी.टी.व्ही. फुटेज ५ मिनिटात काढून आना त्यावेळी तहसीलदार यांच्या दालनात न.पा.चे संजय चौधरी, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ,कृषि अधिकारी भरत वारे आदी बसले होते.
सदरच्या शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबत यापूर्वी मि भ्रमणध्वनि वर स्वतः बोलल्यावर देखील ते मला आज बोलल्या की हा भ्रमणध्वनी माझी खाजगी प्रॉपर्टी आहे व त्यांच्या खाजगी भ्रमणध्वनि वरुन दुसऱ्यां ची शुटींग करण्याची परवानगी त्यांना कोणी दिली असा प्रश्न जयश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला व तालुक्यात अवैध वाळू सर्रास सुरु आहे, रेशन कार्ड मिळत नाही , रॉकेल मिळत नाही, अनेक ठिकाणी हपत्ते आहेत अशी अनेक तक्रारी
नागरिकांच्या आल्याचे त्यांनी सांगितल्या व उद्या दि २० रोजी उपविभागीय अधिकारी अमळनेर , जिल्हाधिकारी जळगाव व वरिष्ठ अधिकारी तसेच पक्षातिल सर्व वरिष्ठ नेत्यांना निवेदन देवून मोर्चा काढून उपोषणाला बसणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा