उस्मानाबाद, दि.21- सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योगसाधना ही आपल्या दैनंदिन जीवनात रुजायला हवी आणि याचे धडे बालवयापासूनच दिले गेले पाहिजेत, असे उद्गार जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज येथे काढले.
पाचव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित योग शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा सरकारी वकील ॲङ शरद जाधवर, नितीन काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, तहसिलदार विजय राऊत, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲङ रवींद्र भोसले, शिक्षणाधिकारी श्री. सुसर, शिक्षणाधिकारी सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक धनंजय काळे, विकास कुलकर्णी, सहाय्यक क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी ,ब्रह्माकुमारी च्या सुरेखा बहेनजी, ॲड. व्यंकटराव गुंड हे उपस्थित होते.
प्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. आर. राजा व जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी योग दिनाच्या निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. विकास गपाट, पतंजलीचे राज्य प्रभारी नितीन तावडे, राम ढेरे यांनी उपस्थितांकडून योग क्रिया करून घेतल्या. त्याचप्रमाणे डॉ. सायली मोरे यांनी ध्यानाचे महत्त्व सांगून उपस्थितांकडून ध्यान क्रिया करून घेतल्या.
कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीचे चंद्रशेखर सुरवसे, अनुरत्ना नागटिळक, विवेक गोवर्धन, रोहिदास सौदागर, अशोक रणसुभे, रविराज देडे, चंद्रकांत गिलबिले, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्रीराम सोनटक्के, रोटरी क्लबचे अभिजित पवार, एकता फाउंडेशनचे अभिलाष लोमटे, प्रजापिता ब्रह्मकुमारी चे सुरेश जगदाळे, प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे
भवानीसिंग राजपुरोहित, उस्मानाबाद मॅरेथॉनचे गिरीश आष्टगी,भारत स्काऊट अँड गाईड चे उपाध्यक्ष अविनाश हंगे, अनुसया शिरसाट, जनार्दन इरले, वैभव लांडगे, रविकांत सुरवसे, प्रशांत मते, विजयकुमार कोळगे, सोमनाथ कुंभार, अश्विनी थोरात यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहरू युवा केंद्राचे लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा