Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ जून, २०१९

रेशनकार्डधारकांना राज्यात कोणत्याही रेशनदुकानातुन कुठेही रेशन मिळावे


 केंद्रीय अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री मा.ना.श्री.रावसाहेब दानवे यांचाकडे भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची निवेदनाद्वारे मागणी



शिरपुर(प्रतिनिधी) रेशनकार्ड धारकांना रेशनवरील अन्नधान्य राज्यात कोणत्याही रेशनदुकानातुन केव्हाही मिळावे अशी मागणीचे निवेदन केंद्रीय अन्न नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री मा.ना.श्री.रावसाहेब दानवे पाटील यांचाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अन्न नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्री.रावसाहेब दानवे पाटील यांची दि.22/6/2019 रोजी मुंबई येथे भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष श्री.बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थित भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी भेट घेवुन निवेदनाद्वारे हि मागणी केली आहे.निवेदनाची प्रत मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस,राज्याचे अन्न नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री मा.ना.श्री.संभाजीराव पाटील,निलेंगेकर यांनादेण्यात आली आहे.निवेदनात पुढे नमुद करण्यात आले आहे कि राज्यात सध्या रेशन कार्ड धारकांना नेमुन दिलेल्या दुकानातुनच अन्नधान्य मिळत असतो.परंतु छत्तिसगड राज्यात माजी 

मुख्यमंत्री.मा.डाॅ.श्री.रमणसिंगजी सरकारने त्यांचा राज्यात रेशनकार्ड धारकांना केव्हाही,कोणत्याही रेशन दुकानातुन रेशनिंगचा माल घेतला जावु शकतो असा ऐतिहासिक निर्णय घेवुन अंमलबजावणी केलेली आहे.त्यामुळे त्या राज्यातील रेशनकार्ड धारक केव्हा ही कोणत्या ही रेशन दुकानावर जावुन थम्स करुण निर्धारीत केलेला माल पैकी कितीही घेवु शकतो.असा कायदा डाॅ.रमणसिंगजी यांनी केलेला आहे.महाराष्टाही छत्तिसगड राज्याचा धर्तीवर निर्णय होवुन 

अंमलबजावणी व्हावी व तसेच त्यामुळे राज्यातील गोरगरीब शिधापत्रिका धारकांना अन्नधान्यापासुन वंचित राहावे लागणार नाही तरी आपण आपल्या स्तरावरुन योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केली आहे.याप्रसंगी

माजी केंद्रीय मंत्री खा.डाॅ.श्री.सुभाष भामरे,भाजपा धुळे जिल्हा प्रभारी तथा प्रदेश चिटणीस श्री.लक्ष्मण सावजी,जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी,जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध