प्रतिनिधी (राजु तडवी ) प्रत्येक माणासाने आपले आचरण करणे गरजेचे आहे. मृत्यू नंतर आपल्या कार्याचे हिशोब आपल्या ईश्वर-अल्लाह समोर द्यावे लागते. महापुरुषांना डोक्यावर न घेता त्यांची शिकवण डोक्यात घेणे गरजेचे आहे व सामाज घडविण्याचे काम करावे असे प्रतिपादन मिडीया सेल जमाते इस्लामी प्रमुख नौशाद उस्मान यांनी केले ते येथील न. पा. सभागृहात जमाते इस्लामी हिंद शाखा तर्फे आयोजित ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी नौशाद उस्मान (मिडीया सेल जमाते इस्लामी प्रमुख, औरंगाबाद), प्रांताधिकारी अजित थोरबोले, मौ. समी साहेब (जिल्हा संघटक, जमाते इस्लामी), अ. रऊफ जनाब, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, मिलिंद वाघूळदे, समाजसेवक रवींद्र होले, नगरसेवक शेख कुर्बान, रईस मोमीन, समाजीककार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर मोठ्या सख्येने उपस्थित होते. यांनी आयोजकांना व उपस्थितांना शुभेच्छा देवून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रांताधिकारी थोरबोले म्हणाले कि, कुरआनची शिकवण हि पवित्र शिकवण आहे. याचे आचरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. जेणेकरून नवीन युवा पिढी समाजामध्ये क्रांती घडवेल व यशाचे उंच शिखर गाठेल असे म्हणाले. कार्यक्रम यशिस्वीतेसाठी जमाते इस्लामी शाखा अध्यक्ष अमान उल्ला जनाब, युथ विंग शहर अध्यक्ष शेख इरफान, नगरसेवक डॉ. इम्रान व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मो. अबुबकर जनाब केले तर आभार अ. रऊफ जनाब यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा