Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ जून, २०१९

लोकप्रतिनिधीवर पोलिसात गुन्हा तर तळागाळातले सामान्यजनहि तहसीलदार देवरे यांच्या कडक कार्यशैलीबद्दल धास्तावले...


अमळनेर(संंदीप सैदाणे)जि प सदस्या जयश्री पाटील व अमळनेर तहसीलदार श्रीमती देवरे यांच्यातील वादाने तालुक्यात चर्चा सुरु असून अमळनेर तहसीलदार श्रीमती देवरे यांनी जयश्री पाटील यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.यामुळे हि बाब आता राजकीय पटलावर व सरकारी वर्तुळात रंगण्याची चिन्हे दिसत आहे.जि प सदस्या जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने उठसूट तहसील कार्यालय येथे काम घेऊन जाणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  ,याअगोदर हि तहसील कचेरीत आपलं बस्तान मांडणाऱ्या काही अनधिकृत स्टॅम्प विक्रेत्यांना त्यांनी कायदेशीर बाबी समोर आणत उठण्यास भाग पाडले तर त्यामुळे कित्येक वर्षापासून येथे बसण्याऱ्या स्टॅम्प विक्रेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

  आता जयश्री पाटील व तहसीलदार श्रीमती देवरे यांच्यातील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत तर जि प सदस्या जयश्री पाटील यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध