Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ जून, २०१९

शिवाजी महाराज बिझनेस गुरु होते - श्रीकांत शेंदरे


प्रतिनिधि : धुळे - रोहीत सिगाणे

तीनशे वर्षापुर्वी शिवाजी महाराज यांनी अशी कोणती "सिस्टीम" लावली होती की ते एवढे मोठे साम्राज्य उभारु शकले?  स्वराज्य उभे करण्यासाठी तेव्हा "कम्युनिकेशन" ची अशी कोणती व्यवस्था त्यांनी राबवली होती? स्वराज्य ही संकल्पना त्यांनी कशी अस्तित्वात आणली व प्रत्येकाला हे माझेच ध्येय आहे असे का वाटु लागले? सुरुवातीला फक्त काही मावळे सोबत असतांना लाखोंची फौज कशी निर्माण करता आली?  असे काय नेमके साधन वापरले की संपुर्ण महाराष्ट्र "स्वराज्य" साठी महाराजांच्या सोबत उभे राहिले?  महाराज इतके "सक्सेसफुल" कसे झाले? तीनशे वर्षानंतर आजही "ती सिस्टीम" वापरुन आपणही बिझनेस मध्ये सक्सेस मिळवु शकतो का?  आपणही अशी "सिस्टीम" उभारु शकतो का?  

महाराजांनी वापरलेले आपत्ती व्यवस्थापन,  वेळेचे व्यवस्थापन,  अर्थकारण,  फंड उभारणी,  मनुष्य बळ व त्यांचे व्यवस्थापन या व अशा अनेक गोष्टी माहित करुन घेण्यासाठी *"शिवाजी,  द बिझनेस गुरु"* या विषयावरील व्याख्यान,  *मंगळवार दिनांक 25 जुन 2019* रोजी *सायंकाळी 5 ते 8* या वेळी *हाॅटेल मल्हार रेजन्सी, करवंद नाका,  पेट्रोल पंप समोर,  शिरपुर* येथे होणार आहे. या व्याख्यानासाठी नाशिक येथील सुप्रसिद्घ, प्रभावी, मंत्रमुग्ध करणारे लीडर तथा व्याख्याते माननीय श्रीकांत शेंदरे सर येणार असुन हजारोंच्या संख्येने या निशुल्क व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन *सेवा एजुकेशन हब* तर्फे करण्यात आले आहे.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजी. पराग अहिरे, महेश बागुल,  रोहित शिंगाणे,  सुरेश माळी,  गोल्डी तनेजा, सत्यम शिंगाणे,  कैलास जाधव,  मीनाताई भोसले,  उमेश सोनवणे,  दिपक भामरे,  दिपेश खिलोसिया,  संदीप देशमुख,  राहुल सानप,  संदीप महाजन,  मनोहर बागुल,  हिमांशु राजपूत, हर्षेश सूर्यवंशी व सेवा टीम हे सहकार्य करीत आहेत.  सर्वांनी उपस्थित राहुन या बिझीनेस व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध