चर्चांना उधाणसंसदेचे अधिवेशन नवी दिल्लीत सुरू झाले असताना राहुल गांधी कुठे आहेत? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधीच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी अनुपस्थित दिसले. राहुल गांधी सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु झाले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्याच दिवशी गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अद्याप मागे घेतला नसल्याची माहिती मिळत आहे.संसदेचे अधिवेशन नवी दिल्लीत सुरू झाले असताना राहुल गांधी कुठे आहेत? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधीच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी अनुपस्थित दिसले. राहुल गांधी सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा वाद अद्यापही न मिटल्याने निर्माण झालेल्या तणावापासून दूर राहण्यासाठी राहुल गांधी यांनी परदेशी जाणे पसंत केले आहे. राहुल गांधी यांनी अमेठीतून पराभव स्वीकारावा लागला होता. स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला होता. आज संसदेत स्मृती इराणी या शपथविधीला आल्या असताना त्यांचे बाक वाजवून स्वागत करण्यात आले. राहुल गांधी हे वायनाड मधून निवडून आले होते. अधिवेशनाचे पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाणार आहे. 19 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील. २६ जुलै रोजी लोकसभा अधिवेशनाची सांगता होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा