Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ जून, २०१९

अंनिसच्या वतीने ग्रामीण रुग्णालयांमध्ये दानपेटी


 

अहमदपूर : प्रतिनिधी :येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेचे प्रधान सचिव मेघराज गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यापूर्वीच्या वाढदिवसानिमित्त दोघा पती,पत्नीने देहदानाचा संकल्प करुन वाढदिवस साजरा केला होता. तसेच स्मशान भूमी स्वच्छता अभियान, कपडा बँक, वृक्षारोपण, प्रत्येक कार्यालयामध्ये डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची प्रतिमा भेट अशा अनेक कार्यातून वाढदिवस साजरा केला गेला. यावर्षी  वेगळी कल्पना राबवण्यात आली.प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी दानपेटी बसवलेले असते.मग ग्रामीण रुग्णालयात का नको ही संकल्पना घेऊन अहमदपूर येथे तालुक्याच्या ठिकाणी या ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व अंनिस कार्यकर्ते मिळून यावर्षी हारतुरे,केक, न कापता परंपरेला फाटा देत दवाखान्यातील  गरजू रुग्णांच्या मदतीसाठी या ठिकाणी दान पेटी व एक व्यक्ती एक झाड याप्रमाणे वृक्षारोपण करून एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत गित्ते,वैद्यकीय अधिकारी डॉ. जयप्रकाश केंद्रे, डॉ.अमृत चिवडे,अनिसचे अध्यक्ष उद्धव इप्पर, प्रा.रत्नाकर नळेगावकर,हरिदास सुरेश डबीर ,बाबन आत्तार,

पूजा गायकवाड,राम तत्तापुरे,प्रा.विश्वंभर स्वामी ,अजहर बागवान ,शेख दस्तगीर, मनोहर पाटील, संदीप गायकवाड, गोविंद काळे, फिरोज शेख, संदीप शिंगाडे, गणेश सुर्यवंशी पारधे मॅडम व समविचारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध