Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ जून, २०१९

गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल- धनाजी नाना महाविद्यालय



प्रतिनिधी :राजू तडवी 

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय हे यावल आणि रावेर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले स्वतंत्र संग्रामाचा जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक, स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्स्फूर्त देणगीतून साकारलेले प्रेरणेचे प्रतिबिंब आणि कै बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीने परिसरातील सर्वच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची उत्तम सोयी पुरविणारे महाविद्यालय आहे.



सन १९६१ पासून तमसो मा ज्योतिर्गमय हे ब्रीद उराशी जपून पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच करियर च्या विविध संधी उपलब्ध करून देणारे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव परिक्षेत्रातील उत्कृष्ठ महाविद्यालय आहे.

नुकतेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या शैक्षणिक गुणवत्ता यादीतील अ श्रेणी प्राप्त महाविद्यालयाचा बहुमान धनाजी नाना महाविद्यालयाला मिळाला आहे.

खान्देशातील प्रताप महाविद्यालय, अमळनेर ने ८८ मार्क्स मिळवून अ श्रेणी प्राप्त केली असून धनाजी नाना महाविद्यालयाने त्या खालोखाल ८० गुण संपादन करून यावल व रावेर तालुक्याला मानाचा तुरा मिळवून दिला आहे.

यासोबत आय एस ओ ९००१:२००८ व आय एस ओ ९००१:२०१५ ह्या निकषावर महाविद्यालय खरे उतरले आहे.

महाविद्यालय राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद बंगलोर च्या तिसऱ्या सायकल साठी सज्ज झाले असून यापूर्वी २००४ मध्ये ७५.२५ गुण मिळवून बी प्लस व सन २०११ मध्ये २.९२ सी जी पी ए मिळवून बी ग्रेड मिळविली आहे. मागील दोन वर्षांपासून तिसऱ्या सायकल साठी उच्चतम ग्रेड मिळवून खान्देशातील न्हवे मात्र राज्यातील उत्कृष्ठ महाविद्यालया पैकी एक अश्या  दिशेने वाटचाल सुरू आहे.

महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित विचार असून अभ्यासक्रम निवडीचे भरपूर पर्याय, सुसज्ज प्रयोगशाळा, आय सी टी युक्त वर्ग, अनुभवी प्राध्यापक, शुध्द पाणी, ग्राहक भांडार, कँटीन सुविधा अश्या सोयींनी युक्त महाविद्यालय आहे.

तापी परिसर व्यवस्थापन मंडळ, प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.


 तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  शिरिषदादा मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष प्रा डॉ एस के चौधरी, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन  लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हा चेअरमन के आर चौधरी सचिव प्रा एम टी फिरके, सदस्य मिलिंद वाघुळदे, प्रा पी एच राणे, यांनी

महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.


 महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा डॉ उदय जगताप, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे,ब सन्मा. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध