प्रतिनिधी :(राजु तडवी) फैजपुर आज दुपारी 02 वाजेदरम्यान अचानक सुरु झालेल्या वादळी पावसानंतर जुन्या बहीणाबाई शाळेजवळ फैजपूर येथील श्री जयंत कोल्हे यांच्या बैलाचा विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने जागीच म्रुत्यु झाला.यावेळी घटनेची माहिती मिळताच संजय रल,नितीन राणे,नगरसेवक अमोल निंबोळे,सामाजिक कार्यकर्ते दिपक होले यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली व संबंधित अधिकार्यांना फोन करून
घटनास्थळी बोलावून घेत पंचनामा करण्यात आला. यावेळी महावितरण.कं चे अधिकारी, कर्मचारी तसेच फैजपूर तलाठी जावळे आप्पा व कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व चौकशी करून लागलीच पंचनामा पुर्ण केला व वरीष्ठ अधिकार्यांना माहिती दिली.
ऐन पेरणीच्या काळात बैलाचा म्रुत्यु झाल्याने शेतकरी श्री जयंत कोल्हे यांच्यावर संकट ओढवले असून त्यांना लवकरात लवकर नूकसान भरपाई मिळावी जेनेकरुन त्यांना नवीन बैल विकत घेऊन शेतीचे कामं करता येतील अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा