Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ जून, २०१९

टेकवाडे सामुहीक बलात्कार प्रकरणी तीन आरोपींना अटक शिरपुर पोलिसांची कामगिरी



धुळे –प्रतिनिधी शिरपुर तालुक्यातील टेकवाडे शिवारातील शेतातील राखणदार विधवा महिलेवर सामुहीक बलात्काराची घटना घडली होती.याप्रकरणी शिरपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . या घटनेतील चार जणांपैकी शिरपुर पोलिसांनी तिघांना अटक केली असुन एका आरोपीचा शोध पोलिस घेत असल्याची माहीती पोलिस आधिक्षक विश्वास पांढरे यांनी दिली.

शिरपुर तालुक्यातील टेकवाडे शिवारातील अशोक जैन यांच्या मालकीच्या शेतात विधवा महिला राखणदार कामाला असुन दि.१५ रोजी राञी माहिला तिच्या झोपडीबाहेर खाटेवर झोपलेली असतांना अनोळखी चार व्यक्तींनी महिलेला बळजबरीने उचलुन नेत सामुहीक बलात्कार केला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.संशायितांच्या शोधार्थ पथके तयार करण्यात आली होती. टेकवाडे,अर्थे,विखरण,वाघाडी,भरवाडे,टेंभे,तर्हाडी,खामखेडा व परीसरातील गावित शोध घेतला तसेच ढाबे,पेट्रोल पंप ,हाँटेल,ढाबे या ठीकाणी तपासणी केली परंतु शोध लागत नव्हता.अखेर मजुरीवर जाणारे व्यक्तींची पडताळणी केली असता भरवाडे गावातील राजेश बदु भिल हा संशयित मिळुन आला.त्याने गुन्ह्याची कबुली दिली असुन साथीदारांचे नावेही सांगितले.त्या नुसार राजेश बादु भिल गोरख भाईदास भिल,शरद गंगाराम भिल सर्व रा.भरवाडे यांना अटक केली असुन रविंन्द्र उर्फ बांगा रामचंद्र भिल रा. भारवाडे याचा शोध पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे ,अपर पोलीस अधिक्षक डॉ.राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी संदीप गावीत,पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत ,सपोनि समाधान वाघ, सपोनि .दिगंबर पाटील, मपोउनि नविता घुगे, पोउनि किरण बा-हे, असई पुरुषोत्तम पाटील, पोना ललीत पाटील, रविंद्र माळी, किरण बागुल, पोकॉ .तुकाराम गवळी, योगेश कोळी, मुकेश पावरा, महेंद्र सपकाळ, प्रविण अमृतकर, समीर पाटील, अमोल

पगारे, अमित रणमळे, स्वप्नील बांगर, नरेंद्र शिंदे, उमाकांत वाघ, भरत चव्हाण, मपोकॉस्वाती शहा, प्रतिभा देशमुख, पौर्णिमा पाटील, रोशनी पाटील, नुतन सोनवणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी

व कर्मचारी अशांनी कामगिरी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध