धानोरा ता.प्रतिनिधी (गणेश चव्हाण)
अमळनेर येथील
ग्रामसेवक/सरपंच यांच्याकडे वेळोवेळी पिण्याच्या पाण्याची मागणी करूनही आमची समस्या सोडविण्यात आलेली नाही.तसेच आमच्या गावात पाणी टंचाई असल्याने
पाण्याचे टॅकर गावात येते व पाणी वाटपाच्या ठिकाणी काही ठरावीक लोकांना पाहिजे तेवढे पाणी दिले जाते.तसेच आमच्या गावालगत खाजगी शेती असून शेतीचे मालक नामे.भाईदास रामा धनगर यांची खाजगी विहीर असून त्यांच्या
विहीरीला मुबलक पाणी असल्याने आम्ही समस्त नागरीक पाणी भरण्यास गेलो असता ते आम्हाला पाणी भरण्यास मज्जाव करीत असतात. त्यामुळे आमचे सर्वांचे पाण्यामुळे हाल होत असतात जवळ पास कुठेही पाणी नाही त्यामुळे नैसर्गिक गरजांना सुध्दा पुरेसे पाणी मिळत नाही. फारच लांबून पाणी आणतो त्याचा फार त्रास सर्वांना होता.तरी आम्हास पाणी मिळण्याची व्यवस्था व्हावी आमच्या भागात पाण्याचा टॅकंर स्वतंत्र यावा कारण काही ठराविक लोक त्यांच्या पुरते पाणी भरपूर घेतात म्हणून आमच्यावर अन्याय होत आहे. तसेच या ठिकाणी घोटाळा. होत आहे व टॅकंरचे पाणी कागदोपत्री वाटप दाखविली जाते याबाबत आमच्या
गावातील संबधीत लोकांची चौकशी व्हावी. अशी मांगणी ग्रामस्तानी निवेदन द्वोरे बी,डि,ओ संदिप वायळ यांच्या कडे केली आहे,
(अमळनेर प्रतिनिधी गणेश चव्हाण )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा