Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ जून, २०१९

नानक साई फाऊंडेशनच्या घुमान यात्रेची नाव नोंदणी सुरू : सहभागीहोण्याचे आवाहन



नांदेड प्रतिनिधी :(पंढरीनाथ बोकारे)

नांदेड- नानक साई फाऊंडेशनची सहावी 'संत नामदेव घुमान यात्रा' 3 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येत असून यात्रेसाठी नाव नोंदणी केली जात आहे.  

संत नामदेव महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने श्री हजूर साहिब  (नांदेड) ते अमृतसर (घुमान) अशी दर्शन  यात्रा आयोजीत केली

जाते. पंजाब व महाराष्ट्रात घुमान यात्रेच्या माध्यमातून बंधूभाव व सांस्कृतिक देवाण घेवाण करण्यात ही चळवळ यशस्वी ठरली आहे. संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करून राष्ट्रीय एकात्मता साधने हा  यात्रेचा मुख्य हेतु आहे. याची दखल घेत पानीपत येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघाने यात्रेला यावर्षीचा पानिपत शौर्य तिर्थ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली संस्था घुमान यात्रेसह विविध सामाजिक उपक्रम राबवते. 

संत नामदेव महाराज यांचा ७४९ वा जन्म उत्सव यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी घुमान येथे मोठ्या स्वरूपात साजरा केला जात आहे. त्या सोहळ्यात यात्रा सहभागी होणार आहे.  लंगर साहिब गुरुद्वारा चे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ जी एवं संत बाबा बालविंदरसिंघ जी यांचा नानक साई फाऊंडेशनच्या या उपक्रमांना 

कृपाआशीर्वाद लाभलेला आहे. यावर्षीची सहावी घुमान यात्रा 3 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. यात्रा नवी दिल्ली, पानिपत,बस्सीपठाणा,  कुरुक्षेत्र,फतेहगड़ साहिब, नैना देवी, भाकरनांगल डॅम, आनंदपूर साहिब,विरासते खालसा राष्ट्रीय म्युजियम, परजियाँ कलां, अमृतसर सुवर्ण मंदिर,पिपली साहिब,  जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर, कार्तिकी स्वामी धाम आणि घुमान या ऐतिहासिक स्थळांना भेट देते.  यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा घुमान यात्रेचे मुख्य संयोजक पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध