Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ जून, २०१९

निरोगी आयुष्यासाठी योग-प्राणायामला पर्याय नाही : रोहन देशमुख



लोकमंगल फाउंडेशन व पतंजली योग समिती आयोजित योग शिबीर संपन्न

 

प्रतिनिधी : विशाल डुकरे तुळजापूर   दैनंदिन जीवनात सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी लहानापासून जेष्ठांपर्यंत योग-प्राणायामचे महत्व मोठे आहे, हे ओळखून जागतिक स्तरावर योग दिवस साजरा करून त्यांचा प्रचार व्हावा यासाठी २१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. यानिमित्ताने युवा नेते रोहन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशन व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कुल, तुळजापूर येथे भव्य योग प्राणायाम शिबिर आयोजित करण्यात आले, यावेळी १५०० नागरीकांनी शिबिरात सहभागी होऊन योग अभ्यासाचा लाभ घेतला. 

          यावेळी बोलताना लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी रोज व्यायाम केल्याने आजारापासून दूर राहण्याची ताकत मिळते, शरीर सुदृढ व मानसिक स्वास्थ लाभते, बालकांपासून पालकांनी योगा एक दिवस न करता रोज करा असे आवाहन केले. प्रसंगी डॉ. प्रशांत सोनटक्के, मीनाताई सोमाजी - कदम, तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राचार्य, जि. प. शाळा, लिटिल फ्लॉवर स्कुलचे मुख्याध्यापक, भारत स्वाभिमान ट्रस्टचे सदस्य, विविध शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, विध्यार्थी, पालक, युवक, परिसरातील नागरिक व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध