Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ जून, २०१९

धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेने तर्फे योगदिवस साजरा



राजू तडवी फैजपूर (प्रतिनिधी)

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्याने आनंदी आणि निरामय आरोग्यासाठी योग याविषयांवर व्याख्यान आणि विविध आसनांचे सादरीकरण करण्यात आले.

यात धनाजी नाना महाविद्यालय, म्युनिसिपल हायस्कुल, फैजपूर, आ ग हायस्कूल, सावदा, धनाजी नाना विद्यालय, खिरोदा या शाळा आणि महाविद्यालयातिल 167 कडेट्स आणि 65 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगा साजरा केला.

मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी योगगुरू रघुनाथ वामन टोके यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांनी योग म्हणजे काय? निरामय आरोग्यासाठी योगाची आवश्यकता? दैनंदिन आयुष्यात करावयाची आसने आणि प्राणायाम यावर सविस्तर माहिती दिली.



कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी हे होते तर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीवितेसाठी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपुत, चीफ ऑफिसर, एस एम राजपुत, चीफ ऑफिसर संजय महाजन, चीफ ऑफिसर व्ही एल विचवे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपुत यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध