Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ जून, २०१९

शेतकऱ्याची फसवणूक केलेल्या परवानाधारक आडते, मदतनीस, व्यापाऱ्यांचे परवाने रद्द


 प्रतिनिधी :विशाल डुकरे     उस्मानाबाद,- मालाचा कडता म्हणून 50 क्विंटल पोत्यामागे एक किलो कडता घेत असल्याबाबत व सॅम्पल म्हणून टोपलीत व्यापाऱ्याकडे नेलेला माल व्यापाऱ्याने परत न दिल्याबाबत तसेच हवा असल्याच्या नावाखाली लिलावात मागणी केलेल्या भावापेक्षा कमी भावात खरेदी केल्याबाबत श्री. महेश वीरेश गव्हाणे, राहणार मुरूम या शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. 


या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आता एम.व्ही.पाटील, अ वर्ग आडत,मुरूम, श्री. विठ्ठल नरसिंग पाटील, मदतनीस, मुरूम, एल. एस. मिनियार, सं.गणेश लक्ष्मीकांत मिनियार, अ वर्ग व्यापारी, मुरूम, गोविंद दाळमिल,सं.श्रीकांत श्रीकिशन मिनियार,अ वर्ग व्यापारी, मुरूम या 

चारही परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले असून त्यांना 01जून 2019 पासून बाजार समिती, मुरूम च्या आवारात नियंत्रित शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात भाग घेता येणार 

नाही,त्यांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही, अशी नोटीस कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरूम चे सचिव यांनी दिली आहे. 

अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरूम च्या आवारात परवानाधारक आडते, मदतनीस, व्यापारी यांनी शेतकऱ्याच्या केलेल्या फसवणुकीबाबत शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत जिल्ह्याच्या सर्व स्तरातून शासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध