Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ जून, २०१९

शिवसेनेत बाहेरून आलेले क्षीरसागर, ‘लक्ष्मीपुत्र’ सावंतांना मंत्रीपद, निष्ठावंतांना पुन्हा एकदा नारळ




 बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे, मलबारहिल येथील राजभवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडत आहे. यामध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे २ आणि आरपीआयला एक मंत्रीपद मिळाले आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदावर नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषद आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.गेली साडेचार वर्षे मंत्रीपदाकडे आस लावून बसलेल्या विधानसभेतील शिवसेना आमदारांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने काहीशी नाराजी दिसून येत आहे. क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, बीड विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेकडे असल्याने त्यांनी भाजपमध्ये न जाता सेनेत प्रवेश केला. तर विधान परिषद आमदार असणारे तानाजी सावंत यांनी २०१५ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. तानाजी सावंत यांना पक्षात ‘लक्ष्मीपुत्र’ म्हणून संबोधले जाते.दरम्यान, शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये देखील पक्षाची साथ न सोडणाऱ्या आमदारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. क्षीरसागर आणि सावंत या दोघांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन शिवसेना आयारामांना थेट कॅबिनेटपदी विराजमान करुन पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याची भावना पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांमध्ये पहायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध