०१) कोलकातामध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ राज्यभरातील डॉक्टर संपावर, रूग्णांचे हाल.
०२) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सरकार विरुद्ध घोषणाबाजी.
०३) प्रसूती झालेल्या महिलेला नवजात बाळासोबत जमिनीवर झोपण्याची आली वेळ, मिरज शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस.
०४) सांगली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
०५) विधानपरिषदेत महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालावर विरोधकांना शंका, तर भाजप सरकारने देशाचा विकासदर फुगवून सांगितल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप.
०६) शाळेचा पहिला दिवस, कुठे गुलाबपुष्प, तर कुठे उंटावरून सवारी करत चिमुकल्यांचं जंगी स्वागत.
०७) चोरीच्या संशयावरुन वर्ध्यामध्ये चिमुकल्याला गरम टाईल्सवर बसवलं, पार्श्वभागाला गंभीर दुखापत, सोशल मीडियावर संतापाची लाट.
०८) आयुक्त निवासाशेजारी सापडलेला वैद्यकीय कचरा अन्न औषध प्रशासनाने केला जप्त, महापालिका, आरोग्य विभागाचे मात्र दुर्लक्षच.
०९) ईव्हीएमविरोधात राज्यभरात वंचित आघाडीचं आंदोलन, सर्वत्र जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद.
१०) मिरज पूर्व भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, आरग येथील बाजार पेठेत झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना अद्यापही अपयश.
११) जत शहरातील जिल्हा परिषद शाळेस मिळाले आयएसओ मानांकन, तालुक्यातील पहिली शाळा.
१२) ईव्हीएम हटावचा नारा देत भारिप ब वंचित बहुजन आघाडी कडून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन, बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी.
१३) गेल्या खरीप हंगामाचा पिक विमा न मिळाल्यामुळे उदगीर नावंदी ग्रामस्थांच्या वतीने उदगीर-जळकोट महामार्गावरील नावंदी पाटी येथे रास्ता रोको.
१४) ईव्हीएम विरोधात भारिप बहुजन महासंघ आणि वंचित आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
१५) कोणत्या गोष्टीवर उधळपट्टी झाल्याने आजरा सहकारी साखर कारखाना तोट्यात गेला, याची चोैकशी व्हावी - सर्व पक्षीय बैठकीत निर्णय.
१६) वनविभाग जबरदस्तीने जमीन परत घेत असल्याच्या विरोधात चंद्रपुरात शेतकऱ्यांनी काढला मोर्चा.
१७) वर्ध्यात हृदयविकाराच्या धक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू,कर्तव्यावर असताना आला हृदयविकाराचा झटका.
१८) निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा शिरोळ तहसिल कार्यालयावर घंटानाद मोर्चा.
१९) रायगड रोहा तालुक्यातील चिंचोली येथील बुडालेल्या मुबंईतील तिन्ही पर्यटकांचे मृतदेह सापडले.
२०) उंटावरून सवारी करत चिमुकल्यांचा शाळेत प्रवेश, सांगलीतील कवलापूर जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम.
२१) नांदेड येथे 'ईव्हीएम हटाव' चा नारा देत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन.
२२) वणी येथे वंचित बहुजन आघाडीचे तहसिल कार्यालयासमोर ईव्हीएम मशीनचे प्रतिकात्मक दहन करत घंटानाद आंदोलन.
२३) शिरोली येथे प्राथमिक शाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन, पालकांनी मुलांच्या आहार आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज - जि.प अध्यक्षा शौमिका महाडीक.
२४) हातकणंगले मौजेवडगांव येथील जिल्हापरीषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय साहित्यांचे वाटप करुन मुलांचे स्वागत.
२५) मिरजेत महिलांनी वटवृक्षाचे पूजन करून वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात केला साजरा.
२६) डच्चू दिलेले मंत्री पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरहजर, नाराज असल्याची चर्चा.
२७) पाचशे फूट लांबून बैलांची शर्यत सोडत मिरजेतील खटावमध्ये कर्नाटक बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा.
२८) हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य पडले धूळखात, लाखोंचा खर्च करूनही साहित्यांचा उपयोग नाही.
२९) अमरावती मोझरी व शिरजगाव परिसरात 18 जणांना अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता.
३०) महापालिकेला निधीसह , विविध मागण्यांसाठी सांगलीचे आमदार, महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट.
३१) रथात सवारी करत विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश, शाळेच्या पहिल्या दिवशी तासगाव जिल्हा प्राथमिक शाळेचा उपक्रम.
३२) सांगलीत शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण सभापती तम्मणगोंडा रवी पाटील यांनी केले नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत.
३३) वटपौर्णिमेनिमित्त अमरावती धामणगांव तालुक्यातील परसोडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
३४) मिरजेत आ. सुरेश खाडे यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधी पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद केला साजरा.
३५) येवल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन.
३६) सांगली महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्या दिवशीच गुलाबपुष्प, दप्तर, गणवेशाने विद्यार्थ्यांचे स्वागत.
३७) आजर्यात गव्यांचा धुमाकूळ, शेतकर्यांवर चढवला हल्ला, गव्याच्या मानवावरील हल्ल्यात वाढ..
३८) शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी चांदोली जाणाऱ्या मुख्य मार्गावर वारणा जलसेतुच्या बोगद्यात पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना धोका.
३९) शिराळा शेडगेवाडीफाटा येथील मुख्य चौकात दिशादर्शक फलक लावल्याने वाहनधारकातुन समाधान व्यक्त.
४०) चंद्रपूर वरोरा तालुक्यात खुद्द लोकप्रतिनिधीच करत आहेत वाळूची तस्करी, तहसीलदारांनी थातुरमातुर कारवाई करीत चार ट्रॅक्टर घेतले ताब्यात.
४१) शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप, शेतकरी वर्ग खरीपाच्या पेरण्या करण्यात व्यस्त.
४२) डॉक्टरवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ चंद्रपुरात डॉक्टरांचे आंदोलनाचे अस्त्र, देशभरातील सर्व दवाखाने राहणार बंद.
४३) रत्नागिरी जिल्ह्यात वटवृक्षाची पूजा करून सुहासिनींनी वटपौर्णिमा सण केला उत्साहात साजरा.
४३) मिरजेत कोलकत्ता येथे डॉक्टरवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे मूक मोर्चा काढून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन.
४४) वर्धा जिल्हात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, वाघाच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण.
४५) नागपूर वरून काटोलला जाणारे भरधाव झायलो वाहन शिवारात उलटल्याने दोन सख्ख्या भावाचा जागीच मृत्यू.
४६) पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नागपूरात खासगी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेऊन केला निषेध.
४७) परप्रांतीयांकडून होणारी मासेमारी रोखण्यासाठी सरकार 6 नविण अत्याधुनिक नौका खरेदी करणार - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर.
४८) 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन मिरजेच्या क्रीडा संकुलावर पडणार पार.
४९) विशाळगडला फिरायला गेलेल्या सांगलीतील तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू.
५०) अंकलीमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा