अमळनेर :प्रतिनिधी (संदीप सैदाणे) भारत देशात सर्वदूर होत असलेले अन्याय त्वरित थांबवावेत,गँरेजवर काम करून उपजिवीका करऩारा झारखंड येथिल तरबेज अन्सारी नावाच्या युवकाला चोरीच्या सशंयावरून खांब्याला बांधून बेदम मारहान केली .तेथिल पोलीस कर्मचारी यांनी त्याला उपचारासाठी रूग्णालयात न नेता
चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्याचा म्रुत्यू झाला .त्याच्या हत्येला कारणिभूत असलेले आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.तरबेज अनसारीच्या पत्निला सरकारी सेवेत
सामाऊन घ्यावे.तिला २५ लाखाची मदत मिळावी या मागणींसाठी अमळनेर युथसेवा फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व मुस्लिम समाजातील प्रतिनीधिंनी दिनांक १ जुलै रोजी उपविभागीय अधिकार्यानां निवेदन दिले.
निवेदन देतांना शेख रियाजोद्दीन अध्यक्ष,गुलाम नबी हाजी उपाध्यक्ष,करिम खॉन पठाण उपाध्क्ष,मसुद रशिद खॉन पठाण सचीव,शेख जाकीर मुनाफ,शराफत अलि,शेर खॉन पठाण,कुदरत अलि,अखतर अलि,जाकीर खॉन,वसिम खॉन,रिजवान शेख,युनुस सुलतान खॉन,शेख फिरोज अन्वर,इत्यादींसह शेकडो नागरिक हजर होते. मॉब लिचींग(झुडशाही)विरोधातील बहुजन क्रांती मोर्चा आयोजीत दिनांक ५
जुलै रोजी जळगाव येथे होत असलेल्या धरणा आंदोलनाला अमळनेर येथुन हजारोंच्या संखेने समाजबांधव जातील असे आमच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देतांना शेख नाविद मुशीरोद्दीन,कुदरत अलि,अख्तर अलि यांनी जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा