Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ जुलै, २०१९

महाराष्ट्रात व धुळे नंदुरबार जिल्ह्यात गुटखा विक्री दिसल्यास १५ ऑगस्टला आत्मदहन करु- दौलत सुर्यवंशी

           ( *दौलत  सुर्यवंशी*)


दोंडाईचा :- महाराष्ट्रासह धुळे, नंदुरबार जिल्ह्यात गुटखा विक्री आढळल्यास अन्न, औषध प्रशासन अधिकार्यांना निलंबित करावे व १५ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात" विमल व तत्सम गुटखा "कडेकोट बंद न झाल्यास येणाऱ्या पंचेचाळीस दिवसानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणत्याही 

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासमोर "आत्मदहन" करू असे आवाहन त्यांनी त्यांच्या पत्रकात अन्न,औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीससाहेब, मुंबई, सह आयुक्त-अन्न, औषध प्रशासन, नाशिक, जिल्हाधिकारी, धुळे, पोलीस अधीक्षक, धुळे, सहायक आयुक्त-अन्न, औषध प्रशासन, धुळे आदींना दिलेल्या तक्रारीचा आशय असा की,

महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या विचार करून राज्यात "गुटखा बंदी "चा निर्णय अमलात आणला. कारण राज्यात शाळकरी मुलांपासून, तरूण, प्रौढ, व वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत गुटखा खाल्ल्यामुळे तोंडाच्या कॅन्सरचा प्रमाणात वाढ होत असल्यामुळे गुटखा उत्पादकांचा विरोध सहन करत स्वतःच्या शंभर कोटीच्या  (राजस्व) नफ्याचा नुकसान स्वीकारत हा कठोर निर्णय घेतला. मात्र निर्णय 

घेतल्यानंतर वर्षभरात साठेबाजानी अवैध मार्गानी गुजरात राज्यातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक करून जादा भावाने महाराष्ट्रात संचयन, विक्री करत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नंदुरबार, धुळे जिल्हा लगतच गुजरात राज्य असल्यामुळे ह्या राज्यात गुटखा निर्मिती, उत्पादन, संचयन, विक्रीला परवानगी आहे. व ह्याच गोष्टीचा फायदा घेत काही बलाढ्य साठेबाज दैनंदिन गुजरात राज्यातून अधिकाऱ्यांना हाताशी धरुन गुटख्याची चोरटी वाहतुक करून 

करोडोची हेराफेरी करत आहे. व हे साठेबाज घाऊक व्यापारी हाताशी धरून त्याना जादा भावाने लाखोचा माल देतात व हे घाऊक व्यापारी किरकोळ व्यवसायीकाना जादा दराने गुटखा विक्री करतात व हेच किरकोळ विक्रेते महाराष्ट्रातील, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील गल्लोगल्लीत, कान्याकोपर्यात शाळकरी मुलांपासून, तरूण, प्रौढ, वयोवृद्ध 

व्यक्तीपर्यंत खुलेआम गुटखा पोहचवतात व हा गुटखा खाल्ल्यामुळे महाराष्ट्रातील  शालकरी ,तरूण , वयोवृद्ध व टॅक्स भरणारी पिढी बरबाद होत आहे. कारण विमल नावाच्या गुटख्यात "मॅग्नेशियम 

कार्बोनेट "पदार्थ वापरत जात असल्यामुळे अनेकांना तोंडाचा व घश्याचा कॅन्सर प्रमाणत जास्त वाढ होत आहे तरी हे साठेबाज घाऊक विक्रेते अन्नभेसळ व पोलिस खात्याचे कर्मचारी अधिकारी हाताशी धरून महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य धोक्यात आणत आहे


महाराष्ट्र राज्यातील अन्नभेसळ व पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी ठरवलं तर त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही शीळ अन्नावरीव माशी सुद्धा मारू शकत नाही मात्र हेच साठेबाज त्यांचे कर्मचारी अधिकारी हाताशी धरून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विमल व इतर तत्सम गुटखा जनतेपर्यंत पाठवून त्यांना तोंडाचा कॅन्सर आजार देऊन मारण्याचा प्लान आखत आहे महाराष्ट्र सरकारने ज्या गुटखा उत्पादकांचे 

ओडोतीसशे करोड रुपयाचे व स्वाताच्या शंभर करोड राजस्वचा नुकसान करत जो गुटख्याचा व्यवसाय बंद केला होता तोच गुटख्याचा व्यवसाय अवैध मार्गांन बात्तारशे करोड रुपयाच्या वर उलाढाल करत आहे म्हणून ह्या साठेबाजांनी सरकारच्या आदेशाचे पालन न करता स्वताचे आर्थिकहीत साधत राज्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात आणले आहे म्हणून आपण सरकारचे हित पाहणारे प्रतिनिधी 

असुन ह्या अन्न व भेसळ खात्याचे राज्य मंत्री असल्यामुळे वरील लेखी तक्रार देतो की येणाऱ्या पंचेचाळीस दिवसात स्वतंत्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या व धुळे व नंदुरबार जिल्हाच्या कान्याकोपऱ्यात विमल गुटखा आढळल्यास संबंधित 

आधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करावे व महाराष्ट्रात गुटखा बंदी कडेकोट कडक करावी अन्यथा महाराष्ट्रात व धुळे नंदुरबार जिल्हात गुटखा विक्री आढळल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालया समोर आत्मदहन करु व होणाऱ्या सर्व कायदेशीर परिणामांची जबाबदारी आपली राहील असे शेवटी त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध