शिरपूर: प्रतिनिधी :शहरातील करवंद रोडवरून विशाल दिगंबर गोसावी वय ३२, दीपक तुकाराम गोसावी वय ३४ हे जात असताना स्वामी रेडियम जवळ विशाल दिगंबर गोसावी याच्यावर अज्ञात
व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला .त्यात विशाल गोसावी याच्या पोटावर तिक्ष्ण हत्याराचे वार लागल्याने जखमी झाला.त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे .ही घटना शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.रात्री घटनेची वार्ता शहरात पसरल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाल्मिक नगर परिसरातील व विशालच्या
नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती रात्री काही काळ तणाव निर्माण झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत घटनास्थळी पोहचले होते . शहरातअनुसूचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.विशाल गोसावी हा हत्याराने वार करणाऱ्यांना ओळखतही नाही अस त्याने सांगितले.विशाल धुळे येथे उपचार घेत असल्याने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा