Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ जुलै, २०१९

भटके-विमुक्त हक्क परिषदेतर्फे नंदुरबार येथे सामाजिक जनजागृती मेळाव्याचे आयोजन जिल्हा नियोजनाची बैठक संपन्न



नंदुरबार :प्रतिनिधी (प्रकाश रामोळे) 

भटके-विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यात विविध ठिकाणी भव्य सामाजिक जनजागृतीच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील पहिलाच मेळावा दिनांक 4 ऑगस्ट 2019 रोजी नंदुरबार येथे संपन्न होत  असून मेळाव्याच्या नियोजनाची बैठक नुकतीच नंदुरबार येथील जोशी गोंधळी सामाजिक भवन येथे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे यांच्या

 अध्यक्षतेखाली संपन्न झाली

मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृती करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असून विद्यमान शासनाच्यावतीने केलेल्या कार्याची व घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची माहिती देणे व विविध शासकीय योजनांची माहिती देणे त्याचबरोबर भटके-विमुक्त 

समाजाच्या  प्रलंबित प्रश्नां बाबत मेळाव्यास उपस्थित लोक प्रतिनिधींसमोर जाहीर ठराव मंजूर करून निवेदन देणे या  उद्देशाने राज्यात विविध ठिकाणी सामाजिक जनजागृती मेळाव्याचे आयोजन होत असून नंदुरबार येथे होणारा हा राज्यातील पहिलाच मेळावा  असून त्याच्या 

नियोजनाची बैठक संपन्न झाली  बैठकीत विविध विभागांची समिती तयार करून विभागांची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली संपूर्ण जिल्हा कार्यकारणी प्रदेश पदाधिकारी विभागीय पदाधिकारी प्रचार व प्रसार समितीत सक्रियपणे काम करणार असून संपूर्ण जिल्हाभर मेळाव्याची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश कोषाध्यक्ष श्री पुरुषोत्तम काळे यांनी दिली संपूर्ण 

जिल्हाभर याबाबत त् गाव वस्ती तांडा येथे जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे त्याकरता जिल्हा संपर्क अभियान राबवले जाणार आहे सदर मेळाव्यास राज्यातील विविध विभागातून समाजबांधवांची उपस्थिती लागणार असून भटके-विमुक्त परिषदेची पूर्ण प्रदेश कार्यकारिणी मेळाव्यास उपस्थित राहणार आहे मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी हजारोंच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवहान श्री पुरुषोत्तम काळे यांनी केले कुणाल फटकाळ यांची युवा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी यांची तर

शहादा तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी श्री तुषार गोसावी यांची निवड जाहीर करण्यात आली तर श्री चुडामण गरदरे यांची शिक्षक आघाडीच्या नंदुरबार जिल्हा सचिव पदी निवड घोषित करण्यात आली विभागीय संघटक अशोक गिरी महाराज जिल्हा कार्यालय सचिव मनोज चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जोशी जिल्हा संघटक राकेश तमायचेकर जिल्हा सहसचिव तुकाराम लांबोळे सर युवा आघाडी अध्यक्ष  रवी गोसावी जिल्हा सचिव महादू हिरणवाळे नवापूर 

तालुकाध्यक्ष आरडी भोईसर तळोदा तालुका अध्यक्ष श्याम भाऊ राजपूत नंदुरबार तालुका अध्यक्ष देवा चव्हाण शहादा तालुका उपाध्यक्ष गणेश चव्हाण शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र वानखेडे धुळे जिल्हा संघटक प्रकाश रामोळे जिल्हा संघटक रवींद्र बेलदार दत्तू सुळ इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती लवकरच भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने  भव्य 

जनजागृती मेळाव्याची माहिती पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याची माहिती श्री पुरुषोत्तम काळे यांनी दिली जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे यांनी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून  प्रत्येकास नियोजनात सहभाग नोंदवला

        श्री गणेश शिवदे

        जिल्हा  प्रसिद्धी प्रमुख

       भटके विमुक्त हक्क परिषद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध