Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० जुलै, २०१९

मुलांना राेज किमान तासभर वेळ द्या त्यांच्या समस्या जाणुन घ्या. पालक शिक्षक मेळाव्याप्रसंगी : माजी आमदार बापूसाहेब रावल यांचे आवाहन!



 
दाेंडाईचा (प्रतिनिधी)दि29/07/2019 राेजच्या जिवनात आपण कितीही व्यस्त असा पण पालक या नात्याने आपण मुलांना किमान राेज एक तास द्या! केवळ मुलांना शाळेची फी भरून व त्यांना शाळेत पाठवुन आपले कर्तव्य पुर्ण हाेत नाही तर आपले मुले शाळेत नेमके काय शिकतात त्यांना काय शिकविले जाते. त्यांना नेमक्या कोणत्या समस्या आहेत. हे जाणून घ्या. त्यांना राेज एक तास वेळ दिल्यास त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक विकास साधता येईल. 



अभ्यासासाेबत मैदानी खेळ सुध्दा महत्वाचे आहेत. त्याशिवाय बालपण अपुर्णच आहे. आजच्या पालकांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडून खुप अपेक्षा आहेत. त्या पुर्ण करण्यासाठी शिक्षक वृंद नेहमी झटत असताे. पण यासाेबत पालक व विद्यार्थ्यांचे देखील काही कर्तव्य असतात ते त्यांनी पार पाडल्यास पदरी माेठे यश मिळते. सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांना निसर्गाचे साैंदर्य दाखवा. पावसाळ्यात वृक्षारोपण करायची त्यांना सवय लावा असे अध्यक्षीय भाषणात माजी आमदार बापूसाहेब रावल यांनी आवाहन केले. 

दाेंडाईचा ता. शिंदखेडा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने वार्षिक पालक शिक्षक मेळाव्याचे आयाेजन काल दि. 28 राेजी सकाळी 10 वाजता दादासाहेब रावल क्रिडा संकुलात करण्यात आले हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार बापूसाहेब रावल उपस्थित हाेते. तर व्यासपीठावर पालक शिक्षक 
असाेशियशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्राचार्या सुरेखा राजपूत, अनिता जयसिंगाणी, ज्याेत्सना मेहता, मुमताज बाेहरी सर आदी व्यासपीठावर उपस्थित हाेते. 

यावेळी ९ वीच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत गाईले. तर बापूसाहेब रावल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पुजन करण्यात आले. यानंतर चलचित्राव्दारे शाळेतील वर्षभरातील कार्यक्रम, स्पर्धा, घडामोडी, ईतिहास, भविष्यातील संकल्पना व वर्तमानातील कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते जळगांव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धात प्रथम क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल, सन्मान चिन्ह व 

प्रशस्तीपत्र देवुन गाैरविण्यात आले. यात साई राजपूत, मनिष राजपूत, जुगल राजपूत, हिंमाशु गिरासे यांचा समावेश हाेता तर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धात तिसरा क्रमांक पटकविलेल्या किष्णा थाेरात (तुळजापूर), चंचल अग्रवाल (शिरपूर)  विशाखा सुर्यवंशी (शिरपूर)  यांनी वरील ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला म्हणून त्यांचा देखील मेडल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवुन गाैरव करण्यात आला. 



 वृक्षांची राेप देत मान्यवरांचा सत्कार
 कार्यक्रमासाठी उपस्थित पालक शिक्षण असाेशियशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष हरिसिंग परदेशी, सदस्य गणेश ठाकुर, दिपक भाेई, मनाेहर गिरासे, आनंद शर्मा, अरमान पिंजारी, मनाेज खैरणार, पंकज जगताप, हरपालसिंग गिरासे, अंबादास मराठे, विजयसिंह गिरासे, श्रीमती सुर्यवंशी, श्रीमती श्राॅफ व दिनेश बाेरसे यांना वृक्षांच्या राेपांची भेट देवुन सत्कार करण्यात आला. वृक्षमित्र माजी आमदार बापूसाहेब रावल यांनी पाडलेला पायंडा आजही कायम आहे. हार तुऱ्यामध्ये पैसे वाया न घालविता प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी किमान एक वृक्ष लावुन ताे जगवायचा आहे. यासाठी ते प्रयत्नशील असतात. 

 यावेळी सुरेखा राजपूत यांनी प्रास्ताविकात पालकांना व विद्यार्थ्यांना विविध सुचना दिल्यात. तर पालकांच्या सुचना व समस्या ऐैकुण घेतल्यात. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास, शाळा व संस्था साेबत पालकांची जबाबदारी या विषयावर त्यांनी 

प्रास्ताविकात प्रकाश टाकला. तर पालक वर्गातुन श्रीमती श्राॅफ व शेख उस्मान अशरफी यांनी आपल्या मनाेगतातुन सांगितले की, मी माझ्या पाल्याचा प्रवेश घेवुन समाधानी आहे. शाळेचे उपक्रम व गुणवत्ता व माझ्या पाल्याची ध्येयाकडे वाटचाल सुरू आहे. तर अशरफी यांनी सांगितले की, शाळेत चांगली शिस्त असुन ति टिकुण रहावी. शिस्तप्रिय व्यक्ती जिवनात यशस्वी हाेताे. शाळेने अनेक अनमोल हिरे दिले असुन अनेक विद्यार्थी देश विदेशात चांगल्या पदावर आहेत. पुढे देखील जातील असे सांगितले. 

कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक साेबत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर माेठ्या       संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमात चलचित्र कार्यक्रम (स्लाईड शाे) साठी रियाज काझी, अनिल माळी यांनी परिश्रम घेतले तर तिलत पठाण, झुंजार पाटील, जयेश राजपूत, सराेजिनी उंद्दपुरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे 
प्रास्ताविक प्राचार्या सुरेखा राजपूत यांनी तर सुत्रसंचालन जयश्री खारकर, राजश्री पाटील यांनी तर आभार खारकर यांनी मानले. 

कॅप्शन : १)  दाेंडाईचा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल येथे पालक शिक्षक मेळाव्यात पालक शिक्षक असाेशिशियनच्या पदाधिकाऱ्यांना वृक्षराेप भेट देतांना चेअरमन बापूसाहेब रावल साेबत सुभाष जाधव, प्राचार्या सुरेखा राजपूत, ज्याेत्सना मेहता, अनिता जयसिंगाणी, मुमताज बाेहरी आदी. 

  कॅप्शन : २/३  दाेंडाईचा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल येथे पालक शिक्षक मेळाव्यात विविध स्पर्धा मध्ये यशस्वी विद्यार्थांचा मेडल, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवुन गाैरवितांना चेअरमन बापूसाहेब रावल, साेबत सुभाष जाधव, प्राचार्या सुरेखा राजपूत, ज्याेत्सना मेहता, अनिता जयसिंगाणी, मुमताज बाेहरी आदी. 


कॅप्शन ४)  दाेंडाईचा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल येथे पालक शिक्षक  मेळाव्याचे दीपप्रज्वलन करतांना माजी आमदार तथा चेअरमन बापूसाहेब रावल, साेबत सुभाष जाधव, प्राचार्या सुरेखा राजपूत, ज्याेत्सना मेहता, अनिता जयसिंगाणी, मुमताज बाेहरी आदी. 



जयपालसिंह वासुदेव गिरासे
माेबाईल. 9823611209
शिरपूर जि. धुळे (दाेंडाईचा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध