Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ जुलै, २०१९

केह्राळे उर्दू शाळेत गणवेश वितरण कार्यक्रम उत्साहात





विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शिक्षणा कडे लक्ष द्यावे. 
सौ.नंदाअमोल पाटील


रावेर प्रतिनिधी(अजीज शेख) तालुक्यातील 
जि.प.उर्दू शाळा केह्राळे बु.  येथे आज समग्र शिक्षा अभियान योजनेंतर्गत शाळेतील एकूण 120 विद्यार्थ्यांना सन्माननीय सौ. नंदा अमोल पाटील 

जि.प.सदस्या जळगांव यांचे हस्ते  गणवेश वितरण करण्यात आले. या वेळी ग्राम पंचायत सरपंच राहूल दादा पाटील,  सदस्या कलीमा निजाम तडवी, माजी प.स. सदस्या जुगरा महेबुब तडवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाजीत महेबुब 

तडवी,समिती सदस्य अमीन शाह,शरीफ तडवी,  करीम तडवी, सुपडा बाई तडवी, सायरा बाई  तडवी, युनुस तडवी, व ग्रामस्थ उपस्थित होते. 

शाळेचे मुख्याध्यापक गौस खान यांनी प्रस्ताविकात सांगितले की सदरील गणवेश वाटप हे समग्र शिक्षा अभियान योजनेतंर्गत आपल्या  शाळेत शिक्षण घेणाऱ्या  सर्व मुली, एस .टी.मुले व बीपीएल मुले यांना लाभ दिला जात आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदा अमोल पाटील यांनी शिक्षक व शालेय वातावरण , शालेय पोषण आहार, उपस्थित भत्ता, सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजना व इतर सर्व विद्यार्थी लाभाच्या योजने बाबत आढावा घेतला व समाधान व्यक्त करून प्रशन्सा केली. 

शाळेत सर्व गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे म्हणून 
 सर्व 120 मुला मुलींना दहा हजार रुपये किमतीचे  बुट वाटप केले.
 
ग्राम पंचायत सरपंच राहूल दादा पाटील यांच्या तर्फे सर्व मुलांना बेल्ट व टाय देण्यात आले . तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या तर्फे 120 विद्यार्थ्यांना सोक्स देण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणाने शाइस्ता शरीफ तडवी व हम्द आफरीन व आशिया, नातशरीफ अयान तडवी यांनी पठण केले.

सौ.नंदा अमोल पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. व उपस्थितांचे स्वागत पुष्प देउन करण्यात आले. 

सुत्र संचालन शेख अलीम सर व आभार शेख रफीक सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी  इलाही नुर सर यांनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध