Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० जुलै, २०१९

निंभोरा येथील विवेक ठाकरे रावेर तालुक्यातुन बहुजन वंचित आघाडी चे प्रबळ दावेदार





(प्रतिनिधी अजीज शेख रावेर )
 धुळे शहरात वंचित आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती :

आज सोमवार,दि.२९ रोजी धुळे येथे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून वंचित आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या.वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.अशोकभाऊ सोनोने,ज्येष्ठ नेते मा.श्री.अण्णासाहेब पाटील आणि महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती रेखाताई ठाकूर या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांनी तिन्ही 

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली.यावेळी वंचितचे रावेर लोकसभा अध्यक्ष विनोद सोनवणे,जळगाव लोकसभा अध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील इच्छुकांचे विहित नमुन्यातील अर्ज सादर केले.

महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष श्री.विवेकभाऊ ठाकरे यांनी सुद्धा रावेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.रावेर विधानसभेतून श्री.ठाकरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून

मुलाखतीवेळी पाठिंबा देण्यासाठी समाजाचे विभागीय अध्यक्ष मा.श्री.पंडितबापू जगदाळे,जिल्हाध्यक्ष श्री.सुनिलबाबा खैरनार,धोबी समाज सुशक्षित बेरोजगार समन्वय समितीचे प्रदेश कार्यवाहक श्री.दिपक मांडोळे यांच्यासह धोबी समाज बांधव, बारा बलुतेदार महासंघाचे 

जिल्हाध्यक्ष श्री.भिमराव वारुडे, नाभिक कर्मचारी महामंडळाचे राज्य पदाधिकारी रमेश पगारे यांच्यासह भारीपचे जिल्हा संघटक विजय अवसरमल,विवरा ग्रा.पं.सदस्य चंद्रकांत गाढे,भारीपचे जिल्हा सचिव महेश तायडे,कोळी समाज तालुकाध्यक्ष मनोहर कोळी,भारिपचे माजी तालुकाध्यक्ष संजय हेरोळे,तालुका 

महासचिव राजकुमार इंगळे,सुरेश अटकाळे,युवराज गाढे,सुरेश अटकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध