Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० जुलै, २०१९
नळदुर्ग येथिल सर्व्हिस रस्त्याच्या मागणीसाठी लाक्षणिय उपोषण
उस्मानाबाद प्रतिनिधी विशाल डुकरे अशोक भाऊ जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले या वेळी आसंख्य नागरीकांनी सहभाग घेतला.
नळदुर्ग शहरातुन गेलेला अक्कलकोट तुळजापूर या राज्यमार्गावर शहरातुन गोलाई ते बसस्थानक या रस्त्यावर चौपदरी करण करताना. रस्त्याच्या दोन्ही बाजुनी सर्हिस रस्ता करणे गरजेचे आसताना तो न करता घिसाड घाईने काम करण्यात येत आहे. अक्कलकोट तुळजापूर हा महामार्ग झाला आसुन रस्त्याच्या दोन्ही बाजुस महाविद्यालय ,शाळा , आहेत तर शहरातिल इंदिरानगर,ठाकरे नगर ,व्यंकटेश नगर,रामलिला नगर,व्यास
नगर,बसस्थानक,भवानीनगर येथिल रहिवाशी नागरीकांना महीला व वृद्ध नागरीकांना ,विद्यार्थ्यांना हा महामार्ग तयार झाल्या नंतर रस्ता पास करणे अवघड जाणार आहे. तसेच वाहतुकीस ही अडथळा निर्माण होणार आहे व आपघात होवुन
मोठ्या प्रमाणात दुर्देवी घटनाही घडण्याची शक्यताआहे.या करीता महामार्गाच्या दोन्ही बाजुनी सर्हिस रस्ता करणे गरजेचे आहे . परंतु सर्व्हिस रस्ता न करता सदर कामाचा ठेकेदार हा घिसाड घाईने काम पुर्ण करीत आहे .जो पर्यत सर्हिस रस्ता पूर्ण करीत नाहीत तो पर्यत हे चौपदरीकरणाचे काम बंद करावे अशी मागणी तुळजापूर
तालुक्याचे नेते अशोकभाऊ जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर कार्यकारी अभियंता सोलापूर यांच्या कडे वारंवार करण्यात आली .तसेच याच मागणीसाठी नळदुर्ग शहरात भव्य मोर्चा काढुन रास्तारोको आंदोलन ही करण्यात आले .परंतु महामार्ग चे आधिकारी जाणुन बुजुन मागणी कडे लक्ष न देता जलद गतीने काम पुर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. हे काम बंद करुन तात्काळ सर्व्हिस
रस्त्याचे काम न केल्यास आंदोलनाची तिव्रता वाढविन्या बरोबरच अमरण उपोषण ही केले जाईल असा इशारा अशोक जगदाळे यांनी दिला या करीता सोमवार दि २९/७/२०९रोजी सकाळी ११वाजल्या पासुन अशोक भाऊ जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग शहरातिल किशोर नळदुर्गकर
,शरद बागल,रमेश जाधव, नगरसेवक नितिन कासार,अमृत पुदाले,नगरसेक महालिंग स्वामी, दयानँद बनसोडे ,शिवसेनेचे कमलाकर चव्हाण ,सरदारसिंग ठाकूर, शहर प्रमुख संतोष पुदाले, ज्ञानेश्वर घोडके ,शाम कनकधर, सिराज काजी,शब्बिर कुरेशी,पञकार विलास येडगे,सुहास येडगे,जहीर इनामदार,आयुब शेख,भगवंत सुरवसे,तानाजी जाधव,राजेंद्र खद्दे,संजय दुबे, भिमाशंकर बताले ,संजय जाधव,बंडप्पा कसेकर,दिलीप
शंकरशेट्टी,गणेश मोर्डे , पंकज हाजारे ,रजनिकांत नागणे,नरेंद्र काळे,मनोज जाधव,तानाजी जाधव,लक्ष्मण जाधव,पिंटू काळे,अमित येडगे,कृष्णा लवटे ,,गौस बागवान,इस्माईल जमादार, समद कुरेशी ,राजु कुरेशी,युसुफ कुरेशी, इब्राहीम
कुरेशी,शहा साजिद गुलाम रसुल, सिद्दिक कुरेशी, शहाजी देडे ,दिगंबर काळे,राजु काळे, सिद्दिक कुरेशी यांच्यासह असंख्य नागरीकांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा